अंगणवाडी कर्मचारी जबाबदार व्यक्तीत्व – डॉ.संध्या पवार  — स्व.इकलाखभाई कुरेशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ विवीध कार्यक्रम व विवीध मान्यवरांचा सत्कार..

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

 चिमूर :- कुंटूबाचा सांभाळ करतानाच सामाजिक क्षेत्रातील अंगणवाडी ताईंचे योगदान अतिशय संवेदनशील आहे.तद्वतच शैक्षणिक क्षेत्रातील वातावरण बदलण्याची त्यांच्यात असलेली क्षमता सर्व मनाला सांभाळून घेणारी असल्याचे प्रतिपादन संध्याताई पवार यांनी स्व.इकलाखभाई कुरेशी यांच्या चिमूर येथील स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रमात केले.

      समाजातील आरोग्याकडे लक्ष देत,अंगणवाडीतील बालकांची देखभाल आपूलकीने करते.मात्र एकीच्या बळावर अंगणवाडी ताई आजच्या स्मृती कार्यक्रमाला पोहचल्या हेच मोठ संघटन आहे असेही संध्याताई पवार म्हणाल्यात. 

        एवढे करूनही समाजात अंगणवाडी ताईची दखल घेतली जात नाही ही एक शोकांतीका आहे.अंगणवाडी कर्मचारी ताई नाहीत तर त्या आई आहेत अवा प्रकारचे व्यक्तव्य कार्यक्रमाच्या उद्धघाटक तथा सामाजिक कार्यकर्त्या संध्या पवार कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

          अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) संलग्न हिंद मजदूर सभा जिल्हा चंद्रपूरच्या वतीने स्व. इकलाखभाई कुरेशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ चिमूर तालुक्यांतील अंगणवाडी कर्मचारी व बचत गट प्रतिनिधी यांचा स्नेह मिलन सोहळा,पत्रकार व विवीध मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा स्मारक चिमूर येथे २० ऑक्टोंबर रविवारला करण्यात आलेले आहे. 

     कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी अध्यक्षा जिल्हा परिषद भंडारा तथा कार्याध्यक्षा अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र किसनाताई भानाकर होत्या तर कार्यक्रमांचे उद्घाटक सामाजिक कार्यकर्त्या डॉ.संध्या पवार होत्या.

       जिल्हा अध्यक्ष तथा विदर्भ महासचिव इमरान कुरेशी,कल्पना साठवणे,प्रकाश बोकारे,उषा अलबनकर,अनू चौधरी,नलीनी खानोरकर,किर्ती शिंदे,सयोगिता गेडाम,विद्या वारजूकर,अनापूर्णा हिरादेवे,तळोधी नाईक येथील सामाजिक कार्यकर्ते शकील शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षा किसनाताई भानारकर अध्यक्षीय भाषणातून अंगणवाडी सेविका कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की संघटना ही महत्वाची असते.संघटनेच्या बळामुळे आपले मानधन वाढले.संघटनेला कमी लेखू नये, संघटना वाढीसाठी प्रयत्न करावा व संघटनेसी जुळून रहावे,संघटनेच्या कर्मचारी सदस्य यांनी एकमेंकाना सहकार्य करावे.

         दरम्यान शिक्षक भारतीचे भास्कर बावणकर,चिमूर तालुका प्रेस,वॉईस ऑफ मिडियाचे पत्रकार,गुणवंत विद्यार्थी,अंगणवाडी सेविकां,मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. 

          अंगणवाडी सेविकां व त्यांच्या पाल्यांनी नृत्य,नाटीका,किर्तन व गायन सादर केले.कार्यक्रमाला वरोरा,चिमूर,सिंदेवाही,नागभिड,भद्रावती,ब्रम्हपूरी येथील अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

       कार्यक्रमाचे संचालन धरती वाघमारे यांनी केले तर आभार माधूरी विर यांनी केले.

       कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अर्पणा नरोले, निलम गेडाम,शोभा गोडे,मनिषा गोठे यांनी श्रम घेतले व सहकार्य केले.