हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मजुराचा तलावात आढळला मृतदेह… — चिमूर येथील घटना…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर : येथील हॉटेल बालाजी मध्ये कामावर असलेल्या युवकाचा मृतदेह हॉटेलच्या मागच्या परिसरातील बालाजी सागर तलावात रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास तरंगताना आढळून आला.अतुल आनंदराव कुमरे असे मृतक युवकांचे नाव आहे.

             प्राप्त माहिती नुसार सावली तालुक्यातील हेटी येथील अतुल आनंदराव कुमरे हा युवक पंधरा दिवसापूर्वी चिमूर येथील बालाजी हॉटेल येथे कामावर रुजू झाला होता. पण अचानक रविवारी त्याचा मृतदेह हॉटेल मागील परिसरात असलेल्या बालाजी सागर तलावात तरंगताना दिसून आला.ही घटना उघडकीस येताच या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

         घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला.

           आकस्मिक मृत्यूची नोंद करून त्याचे शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णायात दाखल केले असून पुढील तपास ठाणेदार संतोष बाकल यांचे मार्गर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ताळीकोटे, पोलीस शिपाई पंडित व चिमूर पोलिसांची चमू करीत आहे.