धार्मिक सद्भावना संमेलन दर्यापुर येथे आयोजित,धार्मिक सद्भावना मंच दर्यापुर चे आयोजन…

युवराज डोंगरे /खल्लार 

           उपसंपादक

          जगातील सर्व धर्मांची मानवाला शिकवण ही माणुसकीची शिकवण असून हे मानवतावादी सद्भावना सतत समाजात तेवत राहावे या उद्देशाने सर्व धर्म पंथ तथा संप्रदायातील धर्मगुरूंचे तथा अभ्यासकांचे सामूहिक सद्भाव संमेलन धार्मिक सद्भावना मंच महाराष्ट्र, दर्यापूरच्या वतीने खालील प्रमाणे आयोजित करण्यात आले आहे.

          धार्मिक सद्भावना मंच महाराष्ट्र च्या वतीने धार्मिक सद्भावना संमेलन दिनांक 20 ऑक्टोबर रोजी स्थानिक माहेश्वरी भवन अकोट रोड बनोसा येथे दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आले असून त्यात विविध धर्माचे धर्मगुरू हे राष्ट्रीय सद्भावना या विषयावर आपले विचार मांडतील.

              सदर सर्व धर्म समभाव संमेलन जेष्ठ विधिज्ञ ऍड.संतोष कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असून प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सय्यद रफिक पारनेरकर सेक्रेटरी धार्मिक सद्भावना मंच महाराष्ट्र पारनेर जिल्हा अहमदनगर तसेच संदीप पाल महाराज राष्ट्रीय प्रवचनकार, नामानंद मुनी लोणारकर महानुभाव पंथ अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद गोपाल आश्रम बुलढाणा प्रभाकर महाराज पूर्णा नगर अमरावती फादर बिशप चर्च कोल्हापूर फादर उमेश चर्च दर्यापूर बोरगाव, भदंत विशाल कीर्ती हरिदास कडू मेहरबाबा केंद्र दर्यापुर , मुक्ता दीदी सगणे नीलू दीदी सगणे,संचालिका प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्र दर्यापूर ,हजरत मौलाना मुक्ती शकीक साहब कासमी (शेकुल हदीस दारूल उलूम सोनोरीजि. अकोला अकोला इत्यादी धर्मगुरू विचारवंत आपले आपापल्या धर्माबद्दल राष्ट्रीय एकात्मता या विषयावर विचार मांडतील.

          तरी ह्या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.