परमात्मा एक सेवकांची कोजागिरी कार्यक्रम संपन्न…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली – परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर अंतर्गत, चर्चासत्र स्थळ , मानव मंदिर, एकोडी रोड, साकोली येथे, कोजागिरी कार्यक्रम संपन्न झाले.

            या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी साकोली परिसरातील मार्गदर्शक श्री. देवराम तुमसरे साहेब होते.

         विशेष अतिथी म्हणून, महेंद्रसिंह गुरबेले, माणिकराव निखारे, आनंद ई. सोनवाने, मधुकर कुंभरे प्रमुख पाहुणे होते.

          सुरेश वलथरे, बाबुराव मेश्राम, प्रकाश खरकाटे, श्रीराम निंबेकर, जसवंत परसगडे, धनंजय तुमसरे, रायभान सोनवाने, सेवकराम बावनकर, शेषराव भानारकर, सुरेश कापगते, दिलीप सोनवाने, चंद्रभान शहारे, राजकुमार कांबळे, पुरुषोत्तम भानारकर यावेळी उपस्थित होते.

          भगवान बाबा हनुमानजी, व मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी आणि वाराणसीआई यांच्या प्रतिमेचे स्वागत व पुष्पहारणे पुजा अर्चना करण्यात आले. यानंतर बाबांच्या शिकवणीवर चर्चाबैठक कार्यक्रम घेण्यात आले.

         गुणानूक्रम प्राविण्यप्राप्त गोल्ड मेडल, शिल्ड विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. पारितोषिक प्रदान आणि सत्कार व स्वागत करण्यात आले.

        यावेळी, सेवक, सेविका, बालगोपालांचे नृत्य, दांडिया, नाटक, गीत, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. भव्य महाप्रसाद व दूध अमृत सर्वांना वाटप करण्यात आले होते.

         कार्यक्रमासाठी परमात्मा एक सेवक देखरेख समितीचे सर्व पदाधिकारी व सेवक परिवार यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाला साकोली परिसरातील बहुसंख्येने सेवक, सेविका, बालगोपाल उपस्थित होते.