मानव मुक्तीच्या लढ्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान महत्वाचे :- प्रकाश मेश्राम (अध्यक्ष मूकनायक फाऊंडेशन)

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

                वृत्त संपादीका 

   डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशातील नागरिकांचे तारणहार आहेत.म्हणूनच मानव मुक्तीच्या लढ्यातंर्गत त्यांचे दुरदृष्टी कोणातील योगदान चिरकाल प्रेरणा देणारे आहे असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करताना मुकनायक फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम मनोगत व्यक्त केले.

      ते चिमूर तालुक्यातील मौजा खापरी (धर्मू) येथे आयोजित करण्यात आलेल्या धममचक्र परिवर्तन दिनानिमित्त मार्गदर्शन करताना बोलत होते.

       आज माणूस स्वर्थापोटी कुटुंबात अडकलेला आहे.तर त्याविरुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले जीवन पणाला लाऊन बौद्ध धम्मातंर्गत जगण्याची नवी दिशा दिली.

        यामुळे मानव विकासासाठी बौद्ध धम्म शिवाय या जगात पर्याय दुसरा नाही.१४ ऑक्टोंबर १९५६ ला आपल्या लाखो अनयायांसह घेत‌लेली बौद्ध धम्माची दिक्षा इतीहासात नोंद झाली आहे.

      विचार मंचावर अध्यक्ष म्हणून गी.अ.मेश्राम (पो.पा.) खापरी धर्मु,प्रमुख मार्गदर्शक प्रज्ञा ताई राजुरवडे समतादुत बार्टी पुणे,अतिथी सौ.निता प्र.मेश्राम समता सैनिक दल प्रमुख खापरी धर्मू,प्रमुख पाहुणे प्रकाश मेश्राम (अध्यक्ष – मूकनायक फाऊंडेशन) उपस्थित होते.

      ध्वजारोहण कार्यक्रम शामराव मेश्राम यांच्या हस्ते पार पाडला तर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि सामूहिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सूर्वात करण्यात आली.

        कार्यक्रमाला २०० बौध्द उपासक उपसिका उपस्थित होते.