मतदारांनो लक्षात ठेवा आणि मतदानाला जातांना पुढील ताज्या बाबी आठवा…..

      गेल्या 10 वर्षांपासून आणि विशेषता अडीच वर्षांपासून आमच्या ( महाराष्ट्रीयन जनतेच्या ) जगण्याच्या धडपडीच्या बळावर या सत्ताधारी अलीबाबा 40 चोरांच्या मिंधे सरकारने मोदी – शहाच्या रझाकारी जोडगोळीच्या पाठिंब्यावर, सर्वोच्च न्यायालयाच्या निष्क्रियतेमुळे…….

असंविधानिक सरकार चालविले……!

     संविधानातील दहाव्या अनुसूचिचे सर्रास उ्लंघन करुन घटनेची मोडतोड केली. काय ते हॉटेल….

   काय ती झाडी….

  काय ते डोंगर…..

     यांची ही वाक्य विसरू नका..हॉटेलमधील आमदारांची पळवा पळवी विसरू नका.

      पहाटेचा फसनवीस आणि अजित पवारचा गुपचूप घेतलेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी विसरू नका….

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील भ्रष्टाचारामुळे पुतळा वाऱ्याने पडला. यांनी महापुरुषांनाही भ्रष्टाचारात सोडले नाही. हे विसरू नका…

       महाराष्ट्र कर्जबाजारी असतांना सुद्धा केवळ निवडणुका तोंडावर आल्यामुळे यांच्या कुटनीतीच्या विकृत मेंदूतून निघालेली यांची लाडकी बहीण यांना आठवली.आचारसंहिता लागेल म्हणून नोव्हेंबरचे ऍडव्हान्स सुद्धा देऊन टाकले. पॆसे देण्यासाठी तिजोरीतील पॆसे संपल्यावर यांनी मुद्रांक 100/-, 200/- चे बंद करुन 500/- रुपयाच्या मुद्रांकाची अट घातली. शिवाय सोयाबीन तेलाचे भाव लिटरमागे 30/35 रुपये अचानक महाग केले.त्याचप्रमाणे बदलापूरच्या शाळेत एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात त्या……

      त्या लाडक्या बहिणीची तक्रार घेण्यासाठी 12 तास ताटकळत का ठेवले….?

      आणि पोलखोल होईल या भीतीने त्या अक्षय शिंदेचा एनकाउंटर करुन ठार मारले….!

         70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा जाहीर सभेत आरोप करणारे मोदी , दोनच दिवसात अजित पवार आणि सोबतच्या भ्रष्टाचारी शिलेदार निष्कलंक कसे सिद्ध होतात आणि त्यांना डायरेक्ट अर्थमंत्रीपद इतरांना मंत्रपदे कसेकाय देऊ शकता?

      तेंव्हा महाराष्ट्रीयन जनतेनो वरील अडीच वर्षाचा इतिहास मतदानाला जातांना आठवा…..

        आणि विशेषकरुन सरकारच्या लाडक्या बहिणींनो, वरील घटना मतदानाला जातांना आठवा….

            जागृतीचा लेखक 

              अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689…