शिवसेना (उबाठा) पक्षाला बळ देणाऱ्या एकनिष्ठ प्रकाश जाधवांनाच रामटेकची उमेदवारी द्या…. — कुंटुब प्रमुख, पक्ष प्रमुखांच्या निर्णयाकडे रामटेकच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचे लक्ष…

      कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

कन्हान : – मानवी जीवनात मुल्यांना अधिक महत्त्व आहे. परंतु आधुनिक काळात मुल्यांना व्यवस्थेने तिलां जली दिलेली दिसुन येत आहे. इमानदार आणि बेईमा न यांच्यातील स्पर्धेत कलयुगी बेईमानच जिंकताना दिसतो. राजकीय पक्ष प्रवेशानंतर सलग पक्षाशी एक निष्ठ राहिलेले कार्यकर्ते सद्या बोटावर मोजण्या इतपर उरलेले आहेत. स्वार्थासाठी कपडे बदलल्या प्रमाणे पक्ष बदलवित आहेत. अशा बिकट परिस्थितीत शिवसेना (उबाठा) पक्षाशी गद्दारी करून पुरोगामी सामाजि क बांधिलकीचे शासन पाडण्यात आले. तरीही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले विदर्भातील शिवसेनेचे माजी खास दार प्रकाश भाऊ जाधव यांना येत्या निवडणुकीत उमे दवारी मिळावी अशी शिवसैनिकांची तसेच सर्वसामा न्य जनमानसांची अपेक्षा आहे.

         विदर्भात नागपुर जिल्ह्यात कन्हान शाखा प्रमुख ते नागपुर जिल्हा ग्रामिण, शहर प्रमुख पदाची यशस्वी वाटचाल करून पक्षाची मुळे खोलवर रूजविण्यास व पक्ष वाढीस प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे प्रकाश भाऊ जाधव यांनी नेहमीच संयुक्त महाराष्टाची भूमिका घेत सर्वसामान्यांची सेवा केली.

          गद्दारीमुळे कमकुवत झालेला पक्षाचा पाया भक्कम करण्याची क्षमता प्रकाश भाऊ कडेच आहे. करिता विदर्भाचे नेतृत्व करण्याची संधी प्रकाश भाऊना रामटेकची उमेदवारी मिळावी अशी शिवसैनिकांनी शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुखां कडे अपेक्षा केली आहे. महाराष्ट्रात पूर्वी कन्हान ग्राम पंचायत ही पिंपरी चिंचवड नंतर दुस-या नंबरवर नाव लौकिक असेलली ग्रा.पं. होती. कन्हान शहरात विविध कारखाने व वेकोलिचा कोळसा खाणी असल्यामुळे केरळ पासुन तर श्रीनगर पर्यंत व बंगाल पासुन तर गुजरात पर्यंत वेगवेगळ्या प्रांतातील कामगार येथे वास्तव्यास आले.

         कालांतराने परप्रांतीयांमुळे स्थानिक मागे पडु लागले. त्यामुळे नवयुवकांनी पुढे येत १९८५ मध्ये नागपुर जिल्हा शिवसेनेचे सदस्य बनुन १९८६ मध्ये प्रकाशभाऊ जाधव यांनी शिवसेना कन्हान शाखे ची स्थापना करित मराठी माणसाचा लढा उभारला. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातुन सर्वसामान्याची सेवा करित तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, नागपुर ग्रामिण जिल्हाप्रमुख चारवेळा, नागपुर शहर जिल्हा प्रमुख पदावर कार्य करून नागपुर जिल्ह्यात शिवसेना वाढवि ण्याकरीता शिवसैनिकांची चांगली फळी निर्माण केली . १९९० साली पहिली रामटेक विधानसभा व १९९६ साली रामटेक लोकसभा निवडणुक लढविली. १९९५ मध्ये युतीच्या सरकारमध्ये अध्यक्ष वनविकास महामंड ळ (महाराष्ट्र राज्य) पदभार सांभाळला.

         २००५ मध्ये रामटेक लोकसभेत शिवसेनेचे सुबोध मोहिते निवडुन आले. मात्र भुजबळ, नारायण राणे नंतर मोहिते केंद्रात मंत्री असताना सुद्धा शिवसेना सोडुन कॉंग्रेस मध्ये गेल्याने २००७ मध्ये झालेल्या रामटेक लोकसभे च्या पोट निवडणुकीत प्रकाश भाऊ जाधव यांनी “निष्ठे ला जपा, आणि गद्दारी ला गाढा” चा नारा देत मोहितें चा पाडाव करित विजय मिळवुन २००७ ते २००९ असे रामटेक लोकसभा सदस्य म्हणुन फक्त २३ महिने पदभार सांभाळत जिल्हयात व विदर्भात शिवसेना बळकट करण्याचे काम केले.

           परंतु रामटेक मतदार संघ एस सी राखीव झाल्याने २०१४ मध्ये हिंगणा विधान सभेत न खचता आलेले अपयश पचवले. कॉग्रेस मधुन आले ले आणि साधे ग्रा.पं, जि.प. सदस्य न झालेले कृपाल तुमाने यांना जनतेने व पक्षाने लोकसभा सीट राखीव झाल्याने २०१४ ते २०२४ पर्यंत शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने याना दहा वर्ष खासदार की दिली आणि आमदार जैस्वाल यांना तीनदा आमदार केले. २०१९ मध्ये युती असताना स्वयंघोषित छुपे समर्थन असल्या चे भाषवुन आशिष जैस्वाल हे अपक्ष निवडुन आले. खनीकर्म मंडळाचे अध्यक्ष पद असे भरभरून दिल्या लरही त्यानी पक्षात गद्दारीची सुरूवात केली.

          आमदार जैस्वाल व खा. तुमाने यांनी रामटेक क्षेत्रात पक्षाचे वर्चस्व कमी करून स्वत:चे वर्चस्व वाढविण्या करिता शिव सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सावत्र वाणगुक देत इतर भाजप, कॉंग्रेस पक्षातील लोकांना वाव देऊ लागले. पुढे पक्ष फुटीत आमदार, खासदार दोघेही मिंदे गटात गेल्याने माजी खासदार प्रकाश भाऊ यांच्या नेतृ त्वात एकनिष्ठ जुने शिवसैनिक पुन्हा एकत्र येत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत खंभीरपणे उभे राहत आ. आशिष जैस्वाल व माजी खा. कृपाल तुमाने यांचा प्रखर विरोध करित जिल्ह्यात शिवसेनेला पोषक वातावरण निर्माण केले. नुकत्याच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हिता करीता शिवसेनेची असलेल्या अमरावती व रामटेक लोकसभा कॉंग्रेसला दिल्यावरही निष्ठेने काम करून बहुमताने खासदार निवडुन आ़णले.

         पक्षाने दोनदा तुमाने ला खासदार व तबल वीस वर्ष जैस्वाल याना आमदार ची संधी बहाल केल्यावर सुध्दा दोघेही पक्षाशी एकनिष्ट न राहिल्याने या गद्दारां ना त्यांची जागा दाखविण्या करीता शिवसेना कुंटुब प्रमुख, पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे साहेबांनी बाळा साहेबाचे कटर निष्ठावंत, पक्षाने दिलेल्या जवाबदाऱ्या वेळोवेळी पार पाडणारे स्थानिय प्रकाश भाऊ जाधव यांनाच रामटेक विधानसभेची उमेदवारी दिल्यास शिव सैनिक निस्वार्थ, अहोरात्र परिश्रम करून शिवसेना (उबाठा) पक्षाला विदर्भात झुंजार निष्ठावंत नेतृत्व मिळविण्या करिता बहुमतांनी आमदार म्हणुन निवडुन आणण्याचा प्रण केला असुन कुंटुब प्रमुख, पक्ष प्रमु खाच्या निर्णया कडे रामटेकच्या निष्ठावंत शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.