कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील शेतकरी खरेदी विक्री सहकारी संस्थांची शनिवार २० मे २०२३ ला होत असलेल्या संचालक पदांच्या निवडणुकीत दोन पक्षात मोठी चुरस निर्माण झाली झालेली आहे.
खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या निर्मिती पासून तर आज पर्यंत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असलेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत एकुण १५ संचालक निवडून द्यायचे आहे.
पण सेवा सहकारी मतदारसंघातुन सर्व पद निवडणूक पुर्वीच काॅग्रेसचे ५ उमेदवार अगोदरच अविरोध निवडून आले आहेत.
१) आनंदराव प्रभाकर काकडे( वाघोली)
२)पुरुषोत्तम मुकुंदराव जवंजाळ ( नयाकुंड)
३) उमाजी भैय्याजी बुरडे (( नवेगाव खैरी)
४) शेषराव माणिक भलावी.( पेंचकुकडा)
५)रेवा दुमाजी भुजाडे ( दहेगाव जोशी).
काॅग्रेसचे वरील उमेदवार सेवा सहकारी संस्था गटातुन अविरोध निवडून आले आहेत.
तर भाजप प्रणीत शेतकरी विकास पॅनलचे अनुसुचित जातीजमाती गट तुन अरुण भानुदास लांजेवार(करंभाड) हे सुद्धा अविरोध निवडून आले आहेत.
सदर निवडणूक अंतर्गत ८०० मतदार ९ संचालकांना निवडून देणार आहेत.
खरेदी विक्री सहकारी संस्था गटातुन ९ उमेदवार निवडून देण्यासाठी ८०० मतदार आपला निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर ८०० पैकी १६० मतदार हे मय्यत आहे. म्हणजे फक्त ७४० मतदारच येत्या २० मे २०२३ ला होत असलेल्या संचालक पदांच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
भाजपा समर्थित भारतिय शेतकरी विकास आघाडी पॅनल चे उमेदवार..
(१)राजेश मधुकर कडू. दहेगाव जोशी)
(२) नेताजी देवरावजी खडतकर. ( माहुली).
(३)सुरेश राघोजी भगत.( करंभाड) (४)दिलिप किसनजी वाळके.( पारशिवनी)
(५) उत्तम चिंतामणराव सायरे.( जुनिकामठी)
(६) सौ. विमल विनायक ( खंडळा मरि).
(७)सौ.छायालक्ष्मणयेरखेडे( पारशिवनी).
(८) चंद्रभान नामदेवराव इंगोले. ( सोनेगाव)
(९) कंचन खेमगिरजी गिरी. ( माहुली)
हे रिंगणात आहेत.
काॅग्रेसचे समर्थित शेतकरी सहकार पॅनल उमेदवार..
(१) राहुन निरंजन पाहाडे.( माहुली) (२)भगवान् गुंडेराव वांढे.( जुनिकामठी)
(३) चंद्रशेखर श्रीराम उपासे.( करंभाड)
(४) रविंद्र आनंदराव काढे. करंभाड)
(५)विरव्यकटराव सत्यनारायण वाकलपुडी.( डुमरी स्टेशन नांदगाव)
(६) सौ. वंदना चंद्रभान चकोले.( पालोरा)
७) गोविंद नामदेवजी कापसे.( पारशिवनी)
(८) माणिकराव श्रावण अमृते. ( चिचभवन)
अपक्ष उमेदवार..
विष्णू मारोतराव बंढे( पारशिवनी) व सौ. वेणु ताई विष्णु बंढे हे पती पत्नी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.
भाजपा साठी प्रतिस्थेची ठरणार निवडणूक
पारशिवनी तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या निर्मिती पासून तर अंदाजे २५ वर्षापासुन आज पर्यंत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असलेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपले आपसी मतभेद विसरून एकत्र येऊन काम करने अपेक्षित असताना मात्र काही निष्ठावान कार्यकर्ते हे पक्ष विरोधात काम करीत असल्याने आता या निवडणुकीत आपली व पक्षाची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी सुधाकर मेंघर सदस्य जिल्हा नियोजन समिती यांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊ दिवटे जिल्हा उपाध्यक्ष ओबिसी,प्रकाश वांढे,किष्णा चिखले,सुरेश भगत,अँड गजानन आसोले,विमल जगनाडे,विजय भांडवलकर,परसराम राऊत, सुधीर कापसे,विजय उपासे,अजितजी कडू,सुधीर अवस्थी,गुंडेराव कुहीटे,आदी जोमाने प्रचार कार्यात आहेत.
तर काॅग्रेसचे माजी मंत्री सुनील बाबू केदार व राजेंद्रजी मुळक व चंद्रपालजी चौकसे यांच्या मार्गदर्शनाखाली पारशीवणी तालुका अध्यक्ष दयाराम भोयर,सो.अर्चनाताई भोयर जिल्हा परिषद सदस्या,सौ रस्मीताई बर्वे जि.प. सदस्या,राजुभाऊ कुसुंबे सभापती जिं.प.,अशोकराव चिखले,श्रीधरजी झाडे महासचिव,इन्द्रपाल गोरले,सिवहरी भड उपाध्यक्ष नरेंद्र जिनिंग,दिपक भोयर,डुमनजी चकोले,चेतन देशमुख माजी उपसभापती,सभापती सौ. मंगलाताई उमराव निम्बोने, उपसभापती करूणाताई भोवते, कस्तुरचंद पालीवाल अध्यक्ष नरेंद्र जिनिंग,खेमराज दळणे,सचिन आमले
आदी अनेक कार्यकर्ते प्रचार करीत आहेत.
**
*पारशिवनी खरेदी विक्री सहकारी संस्था काबीज करण्यासाठी काॅग्रेसचे स्वप्न*
पारशिवनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आली.विरोधकांच्या वाट्याला एकही जागा मिळाली नाही.
व आता कर्नाटक मध्ये काॅग्रेसला मिळालेला विजय बघता आता काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठी उभारी मिळाली आहे.
त्यामुळे आता गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत आपली सत्ता कायम करण्यासाठी काॅग्रेसचे कार्यकर्ते मतभिन्नता विसरून सत्ता स्थापन करण्यासाठी तन मन धनाने एकनिष्ठ राहून कार्य करीत आहे. त्यामुळे आता त्यांना दिल्ली दूर राहीलेली नाही.
म्हणूनच पारशिवनी खरेदी विक्री सहकारी संस्था काबीज करण्याचे त्यांनी स्वप्न पाहणे योग्यच आहे.