विनामूल्य कार्यक्रम,’काँट्रीब्युशन शो’ मुळे गायक-कलाकारांवर संक्रांत…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक

पुणे : गायन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम विनामूल्य करण्याचा,’काँट्रीब्युशन शो’ करण्याचा ट्रेंड पडत असून विनामूल्य कार्यक्रमांमुळे गायक-कलाकारांवर संक्रांत येईल आणि त्यांच्या भवितव्यापुढे गंभीर प्रश्न उभा राहील,त्यामुळे या क्षेत्रातील सर्वानी वेळीच विचार करून या ट्रेन्डला अटकाव करावा,असे आवाहन गायिका आरती दीक्षित यांनी पत्रकाद्वारे केले आहे. 

         कुठलाही स्टेज शो करण्यासाठी भरपूर मेहनत असते. थिएटर,साउंड,व्हिडीओ,बॅनर, जाहिराती असा भरपूर खर्च असतो.एवढं सगळं करुन सादरीकरण विनामूल्य करायचे असेल आणि तरच प्रेक्षक येणार असतील, तर तिकिटांचे गायनाचे,मनोरंजनाचे दर्जेदार होणार नाही,होत पण नाही आणि विनामूल्य कार्यक्रमाचा दर्जाचं चांगला दर्जा म्हणून रूढ होण्याची भीती आहे, असे दीक्षित यांनी म्हटले आहे.करा ओके शो साठी किमान तीस ते पस्तीस हजार आणि लाईव्ह शो साठी पंचाहत्तर ते ऐशी हजार खर्च येतो.हौस म्हणून काही जण एकत्र येऊन ‘काँट्रीब्युशन शो’ -विनामूल्य कार्यक्रम सादर करतात आणि येणाऱ्या रसिकांची काही जबाबदारी नसल्याने ते वाहवाच करतात.

         गायक,वादक होणे ही अवघड साधना आहे. कोणताही व्यवसाय विनामूल्य चालू शकणार नाही,गायक-वादक-कलाकार देखील यास अपवाद नाहीत.इतर व्यवसायिकांना त्यांच्या कामाचा मोबदला,मेहनताना मिळतो. पण कलाकाराना कोणत्या ना कोणत्या निमित्ताने विनामूल्य कार्यक्रम सादर करण्याची गळ घातली जाते.येणाऱ्या रसिकांचे ३ तास मनोरंजन करणे, तसेच त्यांना आपल्या दैनंदिन जीवनात काही त्रास असतील, टेन्शन असतील ती विसरायला लाऊन, आनंद देणे हा एकच ध्यास गायक कलाकारांचा असतो .पण त्यांच्या पदरी निराशाच पडताना दिसते. रसिक म्हणून समाजाची आर्थिक परिस्थिती आज पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्यामुळे त्यांनी विनामूल्य कार्यक्रमाचा आग्रह धरू नये.            

          तसेच वादकांचे मानधन अव्वाच्या सव्वा सांगितले जात आहे. हौशी लोक हे मानधन देतात,कारण ते सतत शो करत नाही. जो ऑर्गनायझर नेहमी कार्यक्रम(शो)करतो त्याची पंचाईत होते.त्यामुळे नेहमी शो करणारे ऑर्गनायझर पण कराओके शो करण्याकडे वळतात, असे निरीक्षण आरती दीक्षित यांनी नोंदवले आहे.सांस्कृतिक राजधानी पुण्यात,महाराष्ट्रमध्ये दर्जाहीन कार्यक्रम,विनामूल्य कार्यक्रम याचा प्रघात पडू नये.अन्यथा हे लोण आवरता येणार नाही, असे आवाहन त्यांनी केले आहे. सर्व गायक, वादकज्ञ ऑर्गनायझर एक झाले तर हे शक्य आहे. आरती दीक्षित यांनी समाज माध्यमांवर यासंबंधी पोस्ट केली असून त्यावर या क्षेत्रातील अनेक जण त्याना पाठिंबा देताना दिसत आहेत.