कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान : – नगरपरिषद अंतर्गत कन्हान नदी काठा लगत सिहोरा गावात व कन्हान परिसरात दहशत निर्माण करणारा वा़घाचा मृतदेह एका धानाच्या शेतात आढळल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
कुठल्या कारणाने वाघाचा मुत्यु झाला हा विषय फारेन्सिक अहवालानुसार पुढे येईलच.
प्राणी व मनुष्य जीवहानी ठळल्याने कन्हान परिसरातील नागरिकांनी मृतक वाघाला बघण्यास चांगलीच गर्दी केली होती व वाघाच्या भिती पासुन मुक्तता मिळाल्याचे समाधान नागरिक व्यक्त केले जात होते.
काल मंगळवार (दि.१५ ) ऑक्टोंबरला दुपारी नगर परिषद अंतर्गत कन्हान नदी काठा लगत सिहोरा गावातील धुमाकुळ घालणारा वाघ हा वाघधरे वाडी दाट लोकवस्ती ला लागुन नागपुर बॉयपास राष्ट्रीय चारपदरी महामार्गापासुन ८० मिटर अंतरावर तारसा रोड वरील खंडाळा शिवारातील सचिन राधेशाम हटवार यांच्या घरा मागिल रेल्वे लाईनकडे असलेल्या हटवार यांच्या धानाच्या शेतात कापसाच्या धु-या लगत वाघ मृत अवस्थेत आढळल्याची माहीती शेत मालकाने वन विभागास दिली.
पारशिवनी वन परिक्षेत्र अधिकारी ए.बी.भगत,वनपाल बि.डी.वरखडे,वनरक्षक एन.के.मेश्रामसह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचुन एनटीसीएच्या मार्गदर्शनानुसार पंचनामा केला आणि अन्य कागदपत्रां अन्वये कार्यवाही करून मृतदेह टीटीसी येथे शवविच्छेदना करिता पाठविण्यात आलाय.
मृत वाघाच्या संबंधाने परिसरात काही संशयास्पद आढळते काय या दृष्टीने चौकशी सुरू आहे.मृत्यूचे मुख्य कारण पोस्टमॉर्टेम अहवालानंतर स्पष्ट होईल.
शवाची उत्तरीय तपासणी आज बुधवार (दि.१६) ला सकाळी १० वाजता नागपुर येथे करण्यात येणार आहे. फोरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर तसेच पुढील तपास केल्या नंतर मृत्यूचे कारण लक्षात येईल.