शिक्षण विभागाच्या कारभारावर जिल्ह्यातून तीव्र असंतोष…  — 12 ही तालुक्यातून एकाच दिवशी गटशिक्षणाधिकारी मार्फत निवेदन…

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली : जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना कंत्राटी शिक्षक भरतीत प्राधान्य असावे तसेच Ctet व Tait चीं अट शिथिल करून Ded व Bed झालेल्या स्थानिक बेरोजगारांना संधी देण्यात यावी असे शासनाचे पत्र आहे.

          तथापी असे असताना आदेशाला डावलून कंत्राटी शिक्षक भरतीत बाहेर जिल्ह्यातील 189 उमेदवार घेण्यात आले. व जिल्ह्यातील उमेदवारांना डावलण्यात आले असून हा स्थानिक बेरोजगारांवर अन्याय आहे आणि शासकीय आदेशाची अवहेलना आहे. बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना घेणे संदर्भात प्रशासनाकडे कुठलेही अधिकृत कारण किंवा आदेश पत्र नाही. 

         जिल्ह्यातील बेरोजगार संघटना व आझाद समाज पार्टी च्या वतीने “जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना दिलेले आदेश तात्काळ रद्द करून जिल्ह्यातील स्थानिक Ded, Bed झालेल्या बेरोजगारांना प्राधान्य देऊन नियुक्त्या देण्यात याव्यात” अशी मागणी करण्यात आली.

         गडचिरोली, चामोर्शी, धानोरा, आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची, मुलचेरा, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी या 12 ही तालुक्यातील बेरोजगार संघटनांचे प्रतिनिधी व आझाद समाज पार्टी च्या वतीने निवेदन देण्यात आले असल्याचे बेरोजगार संघटनेचे जिल्हा संयोजक अंकुश कोकोडे आणि आझाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले.

        जर जिल्हा बाहेरील उमेदवारांचे नियुक्त्या रद्द करण्यात आल्या नाही तर जिल्ह्यातील बेरोजगारांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईलअसा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.