विदर्भात काँग्रेसला बळ….

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

        मागील लोकसभा निवडणुकीचे निकाल बघता आणि स्वातंत्र्य काळातील निवडणुकीचा निकाल बघता विदर्भ हा काँग्रेस पक्षाला बळ देणारा आहे हे सातत्याने अधोरेखित झाले आहे.

        आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुध्दा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला विदर्भातील मतदार बळ देतील असाच कौल आहे.

         महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार हे विदर्भाचेच सुपुत्र असल्याने सहाजिकच आहे ते आपल्या विदर्भातील खासदारांना सोबत घेवून योग्य ताळमेळ ठेवीतली व मित्रपक्षांसह विदर्भातील ६२ पैकी ५० जागा तिन्ही मित्रपक्षांमिळून जिंकण्यांचा आटोकाट प्रयत्न करतील हेही तेवढेच वास्तव आहे.

       यात विदर्भातंर्गत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळणार असल्याची चिन्हे आहेत.

         महाराष्ट्र राज्यांतर्गत राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील हेवेदावे राष्ट्रीय नेतृत्वाने मिटवीले असून विधानसभा निवडणूक जिंकण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य पक्षप्रमुख,राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी,विधानसभा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी,विभाग पदाधिकारी,गावबुथ प्रमुख यांना प्राप्त झाल्या आहेत.

          राष्ट्रीय काँग्रेस पक्ष नियोजनबद्ध पद्धतीने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने त्यांच्या पक्ष पदाधिकाऱ्यांत व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

        पक्ष पदाधिकाऱ्यांत व कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश व विजयी उत्साह असल्याने ते तन आणि मन निष्ठापूर्वक पक्ष हितासाठी कामी आणतिल असेच विदर्भात चित्र आहे.