शिक्षक पतसंस्था दर्यापूरचा नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा संपन्न…

युवराज डोंगरे /खल्लार 

          उपसंपादक

           शिक्षक पतसंस्था दर्यापूर र. नं. 502 ची दि. 13/10/2024 वार रविवारला नव निर्वाचित पदाधिकारी यांचा पतसंस्थाचे कार्यालय वैभव कॉम्प्लेक्स, बनोसा येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

         त्यामध्ये नव निर्वाचित अध्यक्ष संजय साखरे याचे संदीप कोकाटे संचालक शिक्षक पतसंस्था दर्यापूर यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले, तर नव नियुक्त उपाध्यक्ष अशोक बावनेर यांचे राजेंद्र उगले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तर मानद सचिव गजानन गणोदे यांचे शकील सर यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.

         नवनियुक्त खजिनदार सुनील स्वर्गीय यांचे कडू काका व्यवस्थापक यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. तर सर्वं नव नियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव , खजिनदार यांचे संजय नागे संचालक शिक्षक बँक, बाळासाहेब पावडे माजी अध्यक्ष,विनायक चव्हाण माजी उपाध्यक्ष,डी आर जामनिक माजी सचिव, शिक्षक पतसंस्था, माजी खजिनदार प्रशांत गहले ,तज्ज्ञ संचालक असदउल्ला अहमीद यांनी स्वागत केले.

            यावेळी संजय नागे संचालक शिक्षक बँक यांनी नव नियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव, खजिनदार यांना शुभेच्छा देऊन संस्था मागील संचालक मंडळा प्रमाणे भरभराटीला न्यावे ही सदिच्छा व्यक्त केली.तर यावेळी शिक्षक पतसंस्थेचे नव नियुक्त अध्यक्ष संजय साखरे, उपाध्यक्ष अशोक बावनेर, मानद सचिव गजानन गणोदे, खजिनदार सुनील स्वर्गीय यांनी मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे संचालन डी आर जामनिक यांनी केले तर आभार शकील सर यांनी मानले.