डॉ.सतीश वारजूकर एक कणखर नेतृत्व… — चिमूर विधानसभासह महाराष्ट्राच्या मतदारांनी विचार करायलाच पाहिजे….

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

        डॉ.सतीश वारजूकर हे राजकारणातले अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत. ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक,एन्टी व्हिजेंटी,अशा अठरापगड जातींवर,” शासनकर्त्यांनी अन्याय करणारे निर्णय घेतले तर,त्या निर्णयाविरुद्ध आवाज उठविणारी संवेदनशीलता त्यांच्यात दिसून येते.यामुळे त्यांच्या रुपात चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत कणखर नेतृत्व उदयास आले असल्याचे स्पष्ट आहे.

         विकास कामांचा निधी खेचून आणणाऱ्यापेक्षा,”बहुजन समाजातील नागरिकांवर आन्याय करणाऱ्या,”शासन व्यवस्थेविरुद्ध,आवाज उठविणारा व्यक्ती लाख पटीने अमुल्य असतो.कारण असा व्यक्ती समाजाच्या सांस्कृतिचे जतन करतोय व बहुजन समाजातील नागरिकांचे सदैव संरक्षण करतोय.

         डाॅ.सतीश वारजूकरांच्या अन्यायाविरुद्ध नेतृत्वात,”आत्मविश्वास,हिंमत तर आहेच,पण लोकहितांसाठी लढा देण्याची त्यांच्यातील क्षमता न मोजणारी आहे.हिच क्षमता अन्यायग्रस्त समाजातील नागरिकांना न्याय मिळवून देत असतय हे इतिहास सांगतो आहे.

          चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत मतदार हे जाणकार नाही असे मुळीच नाही.ते समजदार आहेत व निर्णयक्षम आहेत.मतदारांनी भावनात्मक विचारांना बळी पडण्यापेक्षा वर्तमान काळातील भविष्यांच्या विचारांना व घडामोडींना महत्व दिले पाहिजे.

         पैसा येतो आणि जातोय,पण,कायदेशीर अधिकार संपुष्टात आले तर आपण काय करणार आहोत?तर हक्क नसलेले गुलाम प्राणी असणार आहोत,याचा सारासार विचार येत्या विधानसभा निवडणुकीत चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत नागरिकांसह महाराष्ट्र राज्यातील मतदारांनी करणे गरजेचे आहे.

       हक्क नसने म्हणजे काय?तर जिवंत असून मेलेला मनुष्य प्राणी होय.मान हालवून काम करणारा महत्वहीन नागरिक होय..म्हणजेच किंमत नसलेला प्राणी,अर्थात मान,सन्मान,स्वाभिमान शुन्य मनुष्य होय!..असे जिवन जगणे टाळायचे असेल तर मतदारांनी बदल करणे शिकले पाहिजे.

           एकाच पक्षाला वारंवार सत्ता दिली तर ते सत्ताधारी कायदेशीर मार्गाने लोकहिताचे सनदशीर कार्य करीत नाही किंवा कर्तव्य पार पाडत नाही हे दुर्दैवाने म्हणावे लागेल.कारण कायदेशीर मार्गाने सनदशीर कार्ये न करण्याचा अनुभव या देशातील नागरिकांना भाजपाच्या सत्ताकाळात वारंवार आलेला आहेच.

        तद्वतच पैसा हे व्यवहारान्वये जगण्याचे साधन आहे तर “हक्क,हे मानसन्मानाने व स्वाभिमानाने जिवन जगणारे बळ आहे,अंग आहे हे मतदारांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.

        जनतेविरोधात अनेक निर्णय घेणाऱ्या आणि महागाईने होरपळून काढणाऱ्या मुजोर व झुडुंबशाही सरकारवर अंकुश लावण्याचा हक्क,भारतीय संविधान निर्माता असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी,_”मतदानाच्या महत्त्वपूर्ण हक्काद्वारे,या देशातील सर्व नागरिकांना दिलेला आहे.

        अर्थात तुमचे हक्क तुम्हीच सुरक्षित ठेवू शकताय,बेताल “सरकार बदलवून….