आज साकोलीत “आदर्श श्री दूर्गा उत्सव स्पर्धेचा”बक्षीस वितरण सोहळा… — सर्व दुर्गोत्सव मंडळ राहतील उपस्थित…

ऋग्वेद येवले 

 उपसंपादक

साकोली :- उपविभागातील शैक्षणिक क्रांती घडवून आणणारी वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था ही नेहमीच धार्मिक क्षेत्रातील कार्यावर तरूणांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचे कौतुकास्पद अभिनंदन व्हायलाच हवे करीता संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी “आदर्श श्री दूर्गा उत्सव स्पर्धा” या नवरात्रीत आयोजन केली होती. 

         याचा आज सोमवार १४ ऑक्टोंबरला नवजीवन विद्यालय नागझिरा रोड साकोली येथे स. ११:३० पासून शानदार बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

        येथे सामाजिक बांधिलकी जपणा-या श्री दूर्गा उत्सव मंडळांचा गुणगौरव करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था साकोली – आदर्श श्री दूर्गा उत्सव स्पर्धा समिती वतीने केले.