बौद्ध समाज धानोरा तर्फे संबोधी बुद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा….

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

बौद्ध समाज धानोरा यांच्यातर्फे 12 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

          यावेळी समाजाचे अध्यक्ष ऋषीजी मशाखेत्री यांच्या हस्ते धम्म ध्वज फडकविण्यात आले. यानंतर भीम गीत सादर करण्यात आले. मान्यवरांचे भाषणाचा कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी चार वाजता शहरातून भिम रॅली चे आयोजन करण्यात आले.

           डीजेच्या तालावर आबाल वृद्धांनी नृत्याचा ताल धरत धानोरा शहर आनंदमयी वातावरन निर्माण झाले. यावेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या उपस्थित होते.