कळाशी येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर,नागरिक हक्क संरक्षण समितीचे आयोजन…

युवराज डोंगरे /खल्लार 

           उपसंपादक 

        तरुण नवदुर्गोत्सव मंडळ कळाशी व दमानी नेत्र रुग्णालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य डोळे तपासणी आणि रोग निदान शिबिराचे आयोजन कळाशी येथे दि (13) रोजी करण्यात आले होते.

        शिबिरामध्ये दमानी नेत्र रुग्णालय अकोला येथील तज्ञ डॉक्टरांद्वारे मोफत वैद्यकीय नेत्र तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक असलेल्या गरजू मोतीबिंदू रुग्णांची दमानी नेत्र रुग्णालय अकोला येथे अत्यंत कमी खर्चामध्ये शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे. नागरिक हक्क संरक्षण समितीचे व तथा प्रख्यात वकिल ऍड .संतोष कोल्हे दर्यापुर यांच्या तर्फे शिबिरातील गरजू लोकांना स्वखर्चाने चष्मे वाटप करण्यात आले. 

         दर्यापूर तालुक्यातील कळाशी या गावी तरुण नवदुर्गोत्सव मंडळाच्या वतीने वतीने उपरोक्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्यात ग्रामीण परिसरातील भागातील शेकडो गरीब स्री पुरुष नागरिकांनी आपले डोळे तपासून घेऊन शिबिराचा लाभ स्वताचे गावातच घेतला अशा प्रकारचे शिबिराचे आयोजन ग्रामीण भागात प्रथमच करण्यात आलेले होते.त्यांचे श्रेय ऍड.संतोष कोल्हे यांना आहे.

          या प्रसंगी नागरिक हक्क समिती दर्यापूरचे सचिव शरद पाटील रोहनकर यांनी नेत्र चिकित्सा शिबिराच्या संदर्भामध्ये तसेच संस्थेच्या वतीने करण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रमाच्या संदर्भात सखोल माहिती दिली.

          तसेच संस्थेचे अध्यक्ष व दर्यापूर येथील ज्येष्ठ वकील व सामाजिक कार्यकर्ते ऍड. संतोष कोल्हे यांच्या सामाजिक कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली कोणता ही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता ऍड. संतोष कोल्हे हे समाज कार्य करीत असतात तसेच नेहमी गोरगरिबांना मदत करतात हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे शरद पाटील रोहनकर यांनी आपल्या भाषणातून प्राधान्याने सांगितले या शिबिरामध्ये अकोला येथील दमानी नेत्रालय च्या डॉक्टरांनी सहभाग देऊन रुग्णांची डोळ्यांची तपासणी केली.

         तसेच ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशांची नोंदणी करून त्यांना अकोला येथे पुढील उपचाराकरता पाठवण्यात येणार असल्याचे शिबिरात जाहीर करण्यात आले.

        कार्यक्रमाचे आयोजना करीता तरुण नवदुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते संदीप राऊत, नितीन कुटे माटे, निलेश निंबोकार, चेतन लोंधे विकास लोंधे, नंदकिशोर फुके, पंडित कुटे माटे अंकुश गावंडे ,दीपक तळोकार, आकाश गावंडे गजानन कळसकर, गजानन बेले ,योगेश गावंडे, विनोद इंगळे, गणेश गावंडे, नरेंद्र कळसकर, प्रज्वल कुटे माटे, निलेश सुलताने, रोशन कुटे माटे, ऋतिक बेले, रोशन राऊत, प्रज्वल गावंडे, नईम मिर्झा इत्यादींनी मोलाचे सहकार्य दिले कार्यक्रमाला नागरिक हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी डॉ. शरद गावंडे डॉ अभय गावंडे, त्याचप्रमाणे पंकज अनासाने इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

        ग्रामीण भागातील गरजु व गरिब जनतेला विनामूल्य नेत्र तपासणी होऊन नंबरचे चष्मे मिळाल्याने ऍड.संतोष कोल्हे यांच्या सेवाभावी कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.