शिवाजीनगर मधील ऐतिहासिक विहीरीची दुरुस्ती करा :- नागरिक हक्क संरक्षण समितीची मागणी…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

          शासनाच्या नगर स्वच्छता अभियान अंतर्गत नगरपरिषद क्षेत्रातील बनोसा भागातील शिवाजीनगर वार्डमधील जुन्या ऐतिहासिक विहिरीची दुरुस्ती करण्याबाबत शिवाजीनगर बनोसा भागातील नागरिकांनी स्थानिक सेवाभावी संस्था असलेल्या नागरिक हक्क संरक्षण समिती माध्यमातून नगरपरिषद प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

          शिवाजीनगर येथील नगर परिषदच्या सार्वजनिक पार्कच्या जागेला लागून एक सव्वाशे वर्षांपूर्वीची मोठ्या आकाराची जुनी व जीर्ण अवस्थेत असलेली ऐतिहासिक विहीर असून या विहिरीतून दर्यापुर शहरात शहानुर पाणीपुरवठा योजना येण्यापूर्वी शहराला आकस्मित पाणीपुरवठा तसेच अग्निशमन व्यवस्थापन करीता पाण्याचा उपसा करण्यात येत असे. तरीही त्यातील पाणी संपत नसे.

           सदर विहीर ही बनोसा भागातील जुन्या काळातील जिनिग फेक्टरी साठी मुंबई च्या व्यापार्यानी बांधली होती. कालांतराने फैक्टरी बंद होऊन तेथे शिवाजी नगर चे ले आऊट पाडण्यात आले.

         सध्या मात्र या सदर विहिरीला उपसा नसल्याने गाळ व कचऱ्याने भरल्या गेली असुन ह्या ऐतिहासिक विहिर मोठ्या आकाराची सद्या शिवाजी नगर मधील”कचरा कुंडी” झाली आहे.

          त्यामुळे परिसरात घाण वास पसरला असून तसेच विहीर आतून पोखरलेल्या गेली असल्याने ही धोका निर्माण झाला आहे.तसेच त्यावर रानटी झाडे सुद्धा उगवली आहे.

           सदर विहीर दुरुस्ती करण्यात साठी तत्कालीन नगरसेवक संदिप पाटील गावंडे यांनी सांगितले की मागील पाच वर्षांपूर्वी विहीरीच्या दुरुस्ती करीता दहा लाख रुपये मंजूर केलेले असुन नप प्रशासनाने त्या वर अजुन कांहीही खर्च केलेला नाही.

           सबब नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसे न.प.ला आकस्मित पाणीपुरवठा करण्याच्या साठी सदर विहीर दुरुस्ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी दिपक चुटे यांच्या नेतृत्वाखाली एका निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासनास केलेली आहे. ह्या वर नगर पालिका काय कार्यवाही करते ह्या कडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले दिसत आहे.