डॉ.सतिश वारजूकरांची भक्कम स्थिती…

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

          वेळ सकारात्मक किंवा नकारात्मक असली तरी जनतेला (नागरिकांना) जवळ ठेवणे हे फार कमी लोकसेवकांना गवसतय.त्यामधील डॉ.सतीश वारजूकर हे एक सद्गृहस्थ…

          डॉ.सतीश वारजूकर हे जिल्हा परिषद सदस्य ते चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधीपक्षनेते राहिलेले अनुभवी राजकीय व्यक्तीमत्व..

         आता ते महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष आहेत व चिमूर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आहेत.धडपड करणारा व्यक्ती नेहमी जनहितार्थासाठी धडपडत राहतो हे त्यांनी आपल्या कुशल कर्तव्यातून सातत्याने दाखवून दिले आहे.

       तद्वतच प्रशासनावर पकड कशी ठेवायची आणि जनतेचे कामे निकाली कसे काढायची, याचा दांडगा अनुभव असलेले डॉ.सतीश वारजूकर हे आता स्वभावाचा समतोलपणा साधन्यात यशस्वी असलेले लोकनेते ठरले आहेत.

           राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी महाराष्ट्र राज्यासह देशात राजकीय स्थिती अनुकूल नसताना,”चिमूर विधानसभा निवडणूक दोनदा लढवून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले तरी काँग्रेस पक्षाचा जनाधार,त्यांनी “जैसे थे ठेवला,नव्हे तर आपल्या कणखर नेतृत्वाने चिमूर विधानसभा मतदारसंघात अहोरात्र मेहनत घेत पक्षाचा जनाधार वाढविला.

          डॉ.सतीश वारजूकरांनी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी केलेले जनआंदोल,कंत्राटी कर्मचारी भरती विरोधातील दिर्घकालीन केलेले धरणे आंदोलन,चिमूर नगर परिषदे अंतर्गत नागरिकांच्या समस्या बाबत सार्वजनिक केलेले जन आंदोलन,ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक यांच्या हितासाठी वेळोवेळी केलेले धरणे आंदोलन,चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दिलासा देणारी ठरली.(याचबरोबर त्यांच्या अनेक आंदलनाचा क्रम आहे.)

             चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठीच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या हितासाठी व संरक्षणासाठी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून डॉ.सतीश वारजूकरांनी अनेक मुद्यांवर तत्परता दाखवली हे विसरता येणार नाही.

           सत्ता पक्षाचा खासदार व आमदार म्हणून सभागृह,सभामंडप,समाजभवन,व इतर कामांसाठी निधी मंजूर करून आणणे सोपी बाब आहे.मात्र,लोकांच्या(नागरिकांच्या) अधिकारांसाठी व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी धडपडणे आणि संघर्ष करणे कठीण काम आहे.हेच कठीण काम व कार्य डॉ.सतीश वारजूकरांनी आतापर्यंत केले आहे,आणि स्वभावगुणधर्मान्वये पुढेही ते जनहितार्थ कार्ये अविरत करतील असे गृहीत धरण्यास हरकत नाही.

         नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी संघर्ष करणे व धडपडणे हे ज्या लोकप्रतिनिधींना जमतय तोच खरा खासदार व आमदार,हे मतदारांनी समजून घेतले पाहिजे..

          सत्तेतील किंवा सत्ता बाहेरील आमदार व खासदार नसताना,डॉ.सतीश वारजूकरांनी नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य व दिलेले योगदान लक्षात घेण्यासारखे आहे.

          याचबरोबर अनेक गोरगरिबांना व विद्यार्थ्यांना डॉ.सतीश वारजूकरांनी केलेली इतर प्रकारची आवश्यक मदत व आर्थिक मदत जिवदान देणारी आणि प्रेरणा देणारी ठरली आहे हे नाकारता येत नाही.

          रात्रंदिवस लोकांच्या हितासाठी धडपडणारे डॉ.सतीश वारजूकर हे आजच्या स्थितीत सातत्यपूर्ण संघर्ष ठरले आहेत व जागरुक व्यक्तीमत्व म्हणून जनमनात रुजले आहेत.

            चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत दोनदा विधानसभा निवडणुक हरल्यानंतर सुध्दा स्वतःला सावरुन जननायक ठरणे साधे कार्य नाही.त्यांची अनेक लोककल्याणकारी कार्ये व कामे लोकमनात सखोल बसली आहेत.

         प्रत्यक्ष चिमूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असता डॉ.सतीश वारजूकरांनी आपली विजयश्री बाजू भक्कम करुन ठेवल्याचे निदर्शनास आले.

         यामुळे चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत निवडणूक चुरशीची होणार नाही तर डॉ.सतीश वारजूकर हे ३० ते ४० हजार मतांच्या लिडने जिंकतील असे समाजमन आढळून आले आहे.

          मात्र,त्यांची सतर्कता आणि पक्ष पदाधिकाऱ्यांसी व कार्यकर्त्यांसी आणि नागरिकांसी त्यांचा सुसंगत संवाद त्यांना मोठे करेल अशी चिन्हे दिसत आहेत.

        (थोडक्यात लोकमन व वास्तव..)