“हम भारत के लोग,या पुस्तकाचे आज दिक्षाभुमीवर १२ वाजता विमोचन… — एक हजार प्रती होणार दान…

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

      महाराष्ट्र राज्यांतर्गत नागपूर येथील जगप्रसिद्ध पवित्र दिक्षाभुमीवर आज,”हम भारत के लोग,या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

           पुस्तक विमोचन कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.देवीदास घोडेस्वार असणार आहेत.आ.देवीदास घोडेस्वार हे भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक आहेत.

      या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पुस्तकाचे अनुवादक आ.भिमराव गणवीर,प्रशिध्द कवी आ.लोकनाथ यशवंत असणार आहेत.

     तद्वतच विशेष अतिथी म्हणून वरिष्ठ आंबेडकरी विचारवंत आयु.मोतीराम बोरकर,भारत सरकार एम.एस.एम.ई.मंत्रालयचे वित्त प्रमुख प्रदीपकुमार खोब्रागडे,वरुड येथील बुध्द धम्माचे प्रचारक निलकंठ यावलकर हे असणार आहेत.

        “हम भारत के लोग,या पुस्तकाचे विमोचन झाल्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.मार्गदर्शन झाल्यानंतर १ हजार पुस्तकांचे दान मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.

          दिक्षाभुमीवर होणाऱ्या,”हम भारत के लोग,या पुस्तक विमोचन कार्यक्रमाला हजर राहण्याचे आवाहन,”बुध्दीस्ट यूथ आॅफ नागपूर,यांनी केले आहे.