साकोलीत पुन्हा ६६ तरूणांचे स्वेच्छेने रक्तदान…  — स्व.आदित्य बाळबुद्धे मित्र परिवाराचे सलग १५ वे आयोजन… 

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

 साकोली : स्व. आदित्य विनायक बाळबुद्धे यांच्या १५ व्या स्मृती प्रित्यर्थ साकोलीत मित्र परिवारांनी सलग १५ वे रक्तदान शिबिरात एकुण ६६ युवकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. येथे समर्पन रक्तपेढी भंडारा यांनी आरोग्य सेवा प्रदान केली. 

          तलाव प्रभागातील श्रीराम भक्त हनुमान मंदीरात आयोजित रक्तदान शिबीराला स्व.आदित्यचे वडील विनायक बाळबुद्धे, आई वैशाली बाळबुद्धे यांनी १५ वे पुण्यस्मरण निमित्ताने पुजन करीत या रक्तदान शिबिरात सुरूवात केली. स. १० ते दू. ४ पर्यंत चाललेल्या या शिबिरात ६६ युवा मित्रांनी येथे रक्तदान करीत स्व. आदित्य बाळबुद्धे यांना हिच अविस्मरणीय आठवतीत श्रद्धांजली वाहिली. 

           या शिबिरात रक्तसंकलन समर्पन रक्तपेढी भंडारा येथील डॉ. रजा शेख, डॉ. नखाते, परीचारीका पोर्णिमा मेश्राम, प्राजक्ता त-हेकार, पुनम गायकवाड, आचल लांजेवार, वाल्मिकी बोंद्रे आदींनी आरोग्य सेवा प्रदान केली.

          हे सर्व आयोजन स्व.आदित्य बाळबुद्धे मित्र परिवाराचे सदस्य इंजि. सपन कापगते, सोनू बैरागी, चंदू कापगते, कुणाल देशमुख, अनुप अतकरी, आशिष कापगते, सुहास गहाणे, भुपेश तरोणे, प्रणय शहारे, विशाल कापगते, विक्की खान, साकेत गायधने, पराग लांजेवार, सागर पुस्तोडे, सुरज पुस्तोडे, विलास लांजेवार, शैलेश गोबाडे, प्रज्वल रोकडे यांनी करीत येथे विशेष सहकार्य केले.

          शेवटी विनायक बाळबुद्धे यांनी सर्व मित्र मंडळांचे कौतुक करीत हृद्यस्पर्शी आभार मानले. शिबिरात माहिती व प्रसार साकोली मिडीयाचे आदित्य चेडगे केले.