वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयास नॅक टीमची भेट….

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक

         वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली येथे दिनांक ३ व ४ ऑक्टोबर २०२४ रोजी नॅक समितीने भेट दिली. या समितीतील अध्यक्ष डॉ. जतीन कुमार सोनी (गुजरात) , समन्वयक डॉ. दीपक मेहता (इंदोर), सदस्य डॉ. तेनाली स्वरूपा राणी (आंध्रप्रदेश) यांनी तपासणी केली. सर्वप्रथम महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी यांनी पीपीटी द्वारे महाविद्यालयाची पूर्ण माहिती सादर केली.

            नंतर महाविद्यालायचे आय क्यू ए सी समन्वयक डॉ. राजश्री यांनी पीपीटी सादर केली. महाविद्यालयाच्या तपासणीकरिता महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. राजश्री यांनी समितीस सहकार्य केले.

           पहिल्या दिवशी समितीने वर्गखोली, ग्रंथालय, क्रीडांगण, प्रयोगशाळा, जिम आणि सर्व सुविधांची तपासणी केली. तसेच माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधला.

           संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्याशी समितीने संवाद साधून शेवटी महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग दर्शविला. दुसऱ्या दिवशी समितीने उर्वरित विभागांना भेट दिल्या व केलेल्या तपासणीचा अहवाल समारोपीय सभेमध्ये प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी यांच्याकडे सुपूर्द केला.

          समितीचे अध्यक्ष अध्यक्ष डॉ. जतीन कुमार सोनी, समन्वयक डॉ. दीपक मेहता, सदस्य डॉ. तेनाली स्वरूपा राणी यांनी महाविद्यालयातील सर्व घटकांना मार्गदर्शन करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजश्री यांनी केले.

          या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्रा. नीरज अतकरी, डॉ. सुनील कापगते, प्रा. अजय कांबळे, डॉ. राकेश सेजवाल, डॉ. संदीप कुमार, डॉ. सुनील अकोलनेरकर, प्रा. विवेक पांडे, प्रा. प्रेम प्रकाश सिंग, प्रा.अशोक कुमार मीना, डॉ. शिवानी पवार, देवेंद्र इसापुरे, पुखराज लांजेवार, शाहीद सैयद, दिव्या कुंभारे, स्वाती झलके, रवींद्र मुंगुलमारे, रश्मी टिकेकर व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.