ऋषी सहारे
संपादक
आरमोरी : कुकडी येथे शिवानी कोवे नामक 17 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीला शोषणा मुळे आत्महत्या करावी लागली. त्यामुळे शोषण करणाऱ्या प्रशांत विशवनाथ भोयर (35 वर्ष ) मु. विहीरगाव नराधमावर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आदिवासी विकास परिषदचे विनोद मडावी यांच्या वतीने करण्यात आले.
दोषीची पत्नी, आई व वहिनीने 3 ऑक्टोबर रोजी शिवानी फकीरदास कोवे हिच्या घरात घुसून तिला मारहाण केली त्यामुळे सदर मारहाण करणाऱ्यांवर सुद्धा ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे आणि या प्रकरणामुळे शिवानी ने बदनामीच्या भीतीपोटी आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्याच आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे अध्यक्ष विनोद मडावी यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने पीडितांच्या आई – वडिलांना भेट देऊन आरमोरी पोलीस स्थेशन ला धडक दिली पोलीस निक्षक गवते साहेबांना सखोल चौकशी करून सर्व आरोपी वर कठोर कारवाई करावी आणि कुठल्याही राजकीय दबावात न येता मुलीला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
आदिवासीच नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याही समाजाच्या मुलीवर जर असा अन्याय होत असेल तर आदिवासी विकास परिषद त्याविरोधात संघर्ष करत राहील असे अध्यक्ष विनोद मडावी यांनी सांगितले.
यावेळी अंकुश कोकोडे, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके , आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषीभाऊ सहारे, जिल्हा सचिव दिनेश बनकर, गडचिरोली विधानसभा प्रभारी धनराज दामले,पीडिताचे आई, वडील उपस्थित होते.