बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
नवरात्रोत्सवाच्या पावन मुहूर्तावर सोनाई प्रतिष्ठानचे संचालक तथा माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रवीण माने यांच्या माध्यमातून सुरवड येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रविण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. रोजच्या त्याच त्याच कामाच्या व्यापातून महिला भगिनींना एखादा आनंदी क्षण मिळावा या विचारांतून आपण हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे प्रतिपादन यावेळी माने यांनी केले.
यावेळी कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेस मानाची पैठणी साडी भेट देण्यात आली होती तर प्रमुख बक्षिसांमध्ये प्रथम क्रमांकाच्या पारितोषिक साठी एल इ डी टीव्ही, द्वितीय पारितोषिक फ्रीज, तिसऱ्या क्रमांकासाठी कुलर तर चौथ्या क्रमांकाला पिठाची चक्की आणि पाचवे पारितोषिक मिक्सर देण्यात आला.
या कार्यक्रमात सराटी गावच्या ऐश्वर्या गणेश शेटे यांना प्रथम क्रमांक, शेटफळ हवेलीच्या प्रियंका समीर साठे यांना द्वितीय क्रमांक, भांडगावच्या दीपिका महिंद्र गावडे यांना तृतीय क्रमांक तर सुरवडच्या वैष्णवी सोमनाथ फुलसुंदर यांना चौथ्या व सुरवड गावच्या पायल बापूसो सुर्वे यांना पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, भरत शेठ शहा, महारुद्र पाटील, adv तेजसिंह पाटील, सागर मिसाळ, छायाताई पडसळकर, अनिकेत निंबाळकर, किरण लावंड, अमोल मुळे, समद सय्यद, बाळासाहेब कोकाटे, आदर्श तरंगे, दत्तात्रय तोरस्कर, नानासाहेब पोळ, बापू जामदार, अभिजीत घोगरे, समाधान बोडके, नागेश गायकवाड, अंकुश दोरकर, नितीन मगर, अरुण घोगरे, बापू जामदार, कैलास येरळकर, मोहन काटे, विजय घोगरे, सुरेश कोकाटे, सनी बंडगर, रोहन लावंड, अशोक घोगरे व समस्त माने कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.