बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये पुणे,सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेच्या उपाध्यक्षा मा.सौ.चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले होते.
ही स्पर्धा दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित केली होती.
स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांचे उज्वल भविष्य घडावे, आदर्श पिढी निर्माण व्हावी, उत्तम वक्ता हा शालेय जीवनापासूनच घडत असतो म्हणूनच या स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पर्धेची विभागणी तीन गटांमध्ये करण्यात आलेली होती त्यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
लहान गट इयत्ता पहिली ते चौथी
प्रथम क्रमांक – गाथा ज्ञानेश्वर मिले-हनुमान हायस्कूल तांदुळवाडी.1001रू,JBVP चषक, प्रमाणपत्र.
द्वितीय क्रमांक – युगंधर रवींद्र जाधव-विद्या प्रतिष्ठान प्राथमिक विद्यालय बारामती 701रू, JBVP चषक, प्रमाणपत्र.
तृतीय क्रमांक – दूर्वा अमरदीप गवळी-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुगाईवाडी पाटण 501रू JBVP चषक,प्रमाणपत्र.
उत्तेजनार्थ क्रमांक1) कलश राहुल सुर्यवंशी 301रु, प्रमाणपत्र.
उत्तेजनार्थ क्रमांक 2) भक्ती प्रवीण वाळुंजकर प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी 301रू, प्रमाणपत्र.
मध्यम गट इयत्ता पाचवी ते सातवी
प्रथम क्रमांक – शर्वरी संजय चौधर विद्या प्रतिष्ठान बारामती बारामती. 3001रू,JBVP चषक, प्रमाणपत्र.
द्वितीय क्रमांक – वैभव अरुण कोकरे त्रिमूर्ती विद्यालय टाकळी. 2001रु, JBVP चषक, प्रमाणपत्र.
तृतीय क्रमांक – साक्षी संजय जगताप नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे 1001रू JBVP चषक, प्रमाणपत्र.
उत्तेजनार्थ क्रमांक – यशोधरा अमर चंदनशिवे गुरुकुल विद्या मंदिर गोखळी 501रू व प्रमाणपत्र.
उत्तेजनार्थ क्रमांक – रिया फिरोज तांबोळी 501रू प्रमाणपत्र.
मोठा गट इयत्ता आठवी ते बारावी
प्रथम क्रमांक यशराज आप्पा हेगडे धर्मवीर संभाजी विद्यालय सातारा 5001रु JBVP चषक, प्रमाणपत्र.
द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वरी सुशांत इंगवले गुरुकुल विद्या मंदिर गोखळी 3001रु , JBVP चषक व प्रमाणपत्र.
तृतीय क्रमांक तनिष्का गणेश जाधव देशमुख प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी
संस्कृती संजय जगताप नव महाराष्ट्र विद्यालय पणदरे 1001रू JBVP चषक प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ क्रमांक 1) तनवीर रवींद्र दवणे छत्रपती हायस्कूल कोर्टी 501रू व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ क्रमांक 2) प्रीती वैजनाथ बोरकर महालिंगेश्वर विद्यालय माळशिरस 501रू व प्रमाणपत्र
वरील विद्यार्थ्यांना JBVP चषक,रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेचे पारदर्शकपणे परीक्षण करण्यासाठी खालील प्रमाणे परीक्षक लाभले होते.
श्री. वि.ना .साळुंखे, श्री. शहाजी अंबादास देशमुख, श्री. राहुल निर्मळ, श्री. व्ही. एस. राजगुरू , श्री.शशिकांत श्रीपाद तेरखडकर व सौ. पिनिता गोळे इत्यादी परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचे पारदर्शकपणे परीक्षण केले , वक्त्याला योग्य तो न्याय दिला. वरील सर्व परीक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ, व सन्मानचिन्ह, मानधन देऊन सन्मान करण्यात आला.
ज्ञवक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचे प्रास्ताविक विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार सर यांनी केले.
बक्षीस वितरण प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माननीय श्री. श्रीमंत ढोले सर यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना व पालकांना अनमोल असे मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की, विद्यार्थी दशेपासूनच वक्ता घडत असतो विद्यार्थ्यांच्या शारीरिक, विकासाबरोबर मानसिक, बौद्धिक विकास घडावा म्हणून म्हणूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. आणि यातूनच वक्तृत्वामधील चौरंगी चिरा घडावा असे मत व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या व सहभागी विद्यार्थ्यांना खचून न जाता अपयशला जिद्दीने सामोरे जावे असे सांगितले.
ज्यांच्या वाढदिवसानिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले, त्या संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की, भाषणातून आपण चांगले काय आहे हे शिकत असतो.
वाचाल तर वाचाल चिंतन केले, चांगल्या वाचनाची गोडी निर्माण झाली तरच उत्तम वक्त घडू शकतो असा मोलाचा सल्ला दिला.
सदर कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष श्री. श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा ढोले, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार श्री. प्रदीप गुरव साहेब,संस्थेचे विश्वस्त चि. ऋषिकेश ढोले, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार, इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री. सम्राट खेडकर, सहभागी स्पर्धक, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.श्रीमंत गुरव यांनी केले.