मी खर बोलतो हाच माझा गुन्हा :- इंदूरीकर महाराज… — शाळा मंदीर झाली पाहिजेत याकडे लोकप्रतीनीधी, सरपंच यांनी लक्ष देण्याची गरज..

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर :- 

            सुशिक्षित बुद्धीमान असतात अस नाही. संसार करणं पराक्रम नाही संसार परमारर्थ करण पराक्रम आहे. भौतीक श्रीमंती क्षणीक असते. वारकरी संप्रदायाचे एकच तत्व आहे. जगातली सर्वच माणसं ईश्वराची लेकरं आहेत. कर्मही देवाची पूजा आहे. चांगल बोला चांगल वागा अशा अनेक विषयांचे धडे उदाहरणार्थ किर्तनातून सांगत असताना माझ्या बोलण्याचे वाभाडे काढले जातात. माझ खर बोलणं लोकांना आवडत नाही. मी खर बोलतो हाच माझा गुन्हा असल्याचे हभप निवृत्ती महाराज (देशमुख ) इंदूरीकर महाराज किर्तनातून श्रोत्यांना सांगताना बोलत होते.

          चिमूर तालुका भारतीय जनता पार्टी व आमदार बंटी भांगडीया यांच्या संकल्पनेतून आदर्श विद्यालय वडाळा (पैकू) बिपीएड ग्राउंड चिमूर येथे आयोजीत किर्तन कार्यक्रमाचे उद्धघाटन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते पार पडले.

         पुढे किर्तनातून इंदूरीकर महाराज बोलताना म्हणाले की, माणसं मोठी नाही माणसांच कर्तव्य मोठ आहे. ज्ञान देव, देवज्ञान, ज्ञानदेव यांचे महत्व पटवून देताना मिसाईल मॅन अब्दूल कलाम, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्तव्यांनी मोठी झालीत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आज सर्वाच दैवत ठरल आहे. आज देशातल्या अनेक जिल्हा परिषद शाळा ओस पावल्या आहेत शिक्षण बरोबर मिळत नाही शाळेच्या कवलांची गळती होत आहे. शिक्षक पगारापुरते काम करतात त्यामूळे विद्यार्थी घडत नाही. पुढची पीढी घडली पाहिजे शाळा ही मंदीर झाली पाहिजेत याकडे लोकप्रतिनीधी, गावातील सरपंच यांनी शाळेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे किर्तनातून इंदुरिकर महारज सांगत होते.

        चिमूर तालुका भाजपाच्या वतीने हभप प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदूरीकर महाराज, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार बंटी भांगडीया यांचा शाल श्रीफळ शिल्ड व ग्रामगिता देवून सत्कार करण्यात आला. यावेळी किर्तनाचे उद्धघाटक चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले की, विकास कामाच्या बाबतीत राज्यातील पंधरा आमदारापैकी आमदार बंटी भांगडीया यांचा पहिला नंबर असल्याचे गौरवउदगार काढत समाज परिवर्तन व विकासाठी आमदार बंटी भांगडीया यांच्या सोबत राहण्याचे आवाहन केले. इंदूरीकर महाराजांच्या किर्तनात चिमूर विधानसभा क्षेत्रातील हजारो नागरीक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.