६ ऑक्टोंबरला चिमुरात सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा मेळावा…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमुर :- महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना तालुका शाखा चिमुरच्या वतीने दिनांक ६ ऑक्टोंबरला पंचायत समिती चिमुरच्या सभागृहात सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याकरीता मेळाव्याचे आयोजन केले आहे.

           या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणुन जिल्हा सल्लागार विजय भोगेकर राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा अध्यक्ष गणपत विधाते, जिल्हा सल्लागार दिपक वऱ्हेकर, जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर बकाने, जिल्हा सचिव सुरेश बोंडे, प्रभाकर पिसे, मुस्तकीम पठाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

           या मेळाव्यात रजा रोखीकरण, सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यांना केंद्राप्रमाणे वेतनात वाढ मिळावी, प्रलंबित समस्या निकाली काढण्यासंबंधी धोरण ठरविणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर पेन्शन अदालत घेण्यात येणार होती.

          परंतु काही कारणास्तव ती पेन्शन अदालत रद्द झाली. जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यांच्या समस्या प्रलंबित आहेत. तसेच उपदान राशी, अंशदान राशी, गटविमा, अपघात विमा, भविष्य निर्वाह निधी, संलग्न गटविमा, निवड श्रेणी, जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांना वाढीव पेन्शन तथा थकबाकी मिळावी तसेच सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते विनाविलंब मिळावी अश्या अनेक विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.

          मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना तालुका शाखा चिमुरचे अध्यक्ष विजेंद्र मुरकुटे, कार्याध्यक्ष गंगाधर भैसारे, सचिव गणपती ठाकरे, सल्लागार देविदास मेश्राम, सिध्दार्थ जिलटे, जिल्हा प्रतिनिधी नारायण कांबळे, उपाध्यक्ष चंद्रभान चांदेकर, ईश्वर सेलोरे, कोषाध्यक्ष बंडु ठाकरे, संघटक मंगल धारणे, चुळामन मुळे, सुनंदा बोंबले, पुष्पा राऊत आदीने केले आहे.