प्रसिद्ध डान्स कलावंत गौतमी पाटील 9 ऑक्टोबरला चिमूरात… — गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमात नागरिकांची हजारोची उपस्थिती राहणार… — गौतम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

          चिमूर – प्रसिद्ध डान्स कलावंत गौतमी पाटीलची क्रेझ महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर देखील गौतमी पाटील हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत असतात. तिच्या डान्सचा कार्यक्रम दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता चिमूर येथील ग्रामगिता महाविद्यालयाचे भव्य मैदानावर आयोजित केला असून या कार्यक्रमात सुमारे वीस हजाराचे वर नागरिक उपस्थित राहतील अशी माहिती चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन चे संयोजक गौतम पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

             या निमित्ताने चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेवराव किरसान, आमदार अभिजित वंजारी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर, शिवानी वडेट्टीवार, तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, प्रा. राम राऊत, पंजाबराव गावंडे, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस ओबीसीचे प्रदेश संघटक धनराज मुंगले, संजय डोंगरे,संजय घुटके, ऍड. दिगंबर गुरुपूडे, जिल्हा परिषद माजी सदस्य गजानन बुटके आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

           या कार्यक्रमा बाबत सविस्तर माहिती देताना मुख्य आयोजक गौतम पाटील म्हणाले, गौतमी पाटील हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. गौतमी हिच्या कार्यक्रमांना देखील चाहत्यांची मोठी गर्दी जमते. 

            हिचा कार्यक्रम आणि कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी नाही असं कधीच झालेलं नाही गौतमी पाटील हिची एक झलक बघण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. त्यामुळे शांतता व सुव्यवथा अबाधित राखण्याची काळजी घेण्यात येणार आहे. अशीही माहिती पत्रकार परिषदेत पाटील यांनी दिली.

            यावेळी धनराज मुंगले यांचे मार्गदर्शनात चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशनचे संयोजक गौतम पाटील यांचे सोबत राजेंद्र लोणारे, प्रदीप तळवेकर, लोकनाथ रामटेके, जिल्हा परिषद बांधकाम माजी सभापती गुणवंत कारेकर आदी उपस्थित होते.