मुख्याध्यापक संघाचा जिल्हा गुणवंत पुरस्कार प्राचार्य दिपक मुंगसे यांना जाहीर…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : श्री.ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री.ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दिपक महादेव मुंगसे सर यांना पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा जिल्हा गुणवंत पुरस्कार जाहीर झाला असून भारतीचे माजी राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त व शिक्षक दिनाचे औचित्य साधून रविवार दि.६ ऑक्टोंबर २०२४ रोजी अकुंशराव लांडगे सभागृह भोसरी येथे सकाळी १०.३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

          संपादक संजय आवटे, आ.महेश लांडगे, शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर, तानाजी माने यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केला जाणार आहे.

           प्राचार्य दिपक महादेव मुंगसे सर हे गेली 30 वर्षे झाली श्री.ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री.ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये अध्ययनाचे कार्य करत होते सध्या ते श्री.ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री.ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहे.

           त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना मुख्याध्यापक संघाचे जिल्हा गुणवंत पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त प्रकाश काळे, दिपक पाटील, इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, शिवसेना शहरप्रमुख राहूल चव्हाण, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव पाखरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.