माँ मानिका देवी सभागृहात होणाऱ्या लग्नात भोजनाचा खर्च भांगडिया फॉउंडेशन करणार :- आमदार बंटी भांगडिया…  — खडसंगी येथे दोन कोटी रुपयाच्या माँ मानिका देवी सामाजिक सभागृहाचे लोकार्पण…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :- खडसंगी येथील माँ मानिका देवी सभागृहात होणाऱ्या प्रत्येक मुलीच्या लग्नाचा संपूर्ण जेवणाचा खर्च फॉउंडेशनच्या वतीने करण्यात येणार असल्याचे आमदार बंटी भांगडिया यांनी सांगितले खडसंगी येथील माँ मानिका देवी सभागृह बांधकाम साठी दोन कोटी रुपये देऊन अवघ्या आठ महिन्यात भव्य असं सभागृह बांधकाम पूर्ण करण्यास त्यांना यश आले.

          याप्रसंगी आमदार बंटी भांगडिया यांचे जंगी स्वागत करण्यात आले.आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले.

            यावेळी आमदार भांगडिया पुढे म्हणाले आपण केलेले समाज हिताचे काम, आपल्या वरील प्रेम, विश्वास, आशीर्वाद यामुळे सेवा कार्य करीत असून शासनाच्या विविध योजना सांगत सदैव मी माना समाजाच्या पाठीशी राहण्याची ग्वाही देत आमदार भांगडिया यांनी मार्गदर्शन केले.

            दिनांक २ ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामदर्शन विद्यालय खडसंगी च्या प्रांगनात लोकार्पण सोहळा प्रसंगी आमदार बंटीभाऊ भांगडिया बोलत होते.

             यावेळी मंचावर माना समाज युवा नेते राहुल दडमल, भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे,माजी पंचायत समिती सदस्य अजहर पटेल,भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार ,भाजपचे युवा नेते समीर राचलवार,भाजपचे जेष्ठ नेते मजहर पटेल,महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौं माया नन्नावरे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मंगेश धाडसे, किसान नेते एकनाथ थुटे,सरपंच प्रियंका कोलते, रणजित सावसाकडे, पुरुषोत्तम गायकवाड प्रभाकर दोडके, वेणूदास बारेकर हेमंत जांभूळे, विनोद रणदिवे, युवा मोर्चा चिमूर शहर अध्यक्ष बंटी वनकर,कवडू खडसंग, सौ छायाताई कंचर्लावार आदी मान्यवर उपस्थित होते.

           दरम्यान ग्रामदर्शन विद्यालयाच्या वतीने संस्थेचे विनोद रणदिवे, प्राचार्य सदाशिव मेश्राम यांनी आमदार बंटी भांगडिया यांचे शाल श्रीफळ देऊन करण्यात आले. डॉ. दिपक दडमल, नितेश दोडके यांच्या टीम ने सुद्धा आमदार भांगडिया यांचा सत्कार करण्यात आला.

             वसंत धुर्वे नामक कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्या ने खडसंगी भाजप कार्यकर्त्यांनी स्वतः कडून वर्गणी गोळा करीत झालेली रक्कम सहानुभूती मदत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते मृतक च्या पत्नीस देण्यात आली.

           यावेळी आमदार बंटी भांगडिया यांनी भांगडिया फॉउंडेशन च्या वतीने वसंत धुर्वे यांच्या दोन्ही मुलीच्या नावे 25-25 हजार रुपये फिक्स डिपॉजिट करण्याची घोषणा केली कार्यक्रमाचे संचालन राकेश जिवतोडे यांनी केले. प्रास्ताविक प्रमोद श्रीरामे यांनी केले. खडसंगी जिल्हा परिषद क्षेत्रातील मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.