मानवताची खरी सेवा करणारे आमदार बंटी भांगडिया :- धम्मदूत डॉ.गगन मलिक  — सुगतकुटी येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना तथा सामाजिक सभागृह लोकार्पण संपन्न…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

 चिमूर :- तालुक्यांतील सुगतकुटी मालेवाडा येथे धम्मदुत डॉ. गगन मलिक फाऊंडेशन व भांगडिया फाऊंडेशन यांच्या वतीने थायलंड देशातून ८ फूट व ५ फूट उंच अश्या दोन बुद्धरुप प्रतिष्ठापना समारोह व सामाजिक न्याय विभागांतर्गत बांधलेल्या भव्य सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळा कार्यक्रम दिनांक 1 ऑक्टोंबर ला सुगतकुटी मालेवाडा येथे संपन्न झाला.

       सदर कार्यक्रमांचे उद्घाटक म्हणुन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमांचे प्रमूख अतिथी म्हणून कॅप्टन नट्टाकिट चाइचेलर्ममॉग्नखोन वॉट थाट थांग – रॉयल मॉनेस्ट्री, थायलंड, धम्मदूत डॉ. गगन मलिक अध्यक्ष, गगन मलिक फाऊंडेशन हे उपस्थित होते.

         तर कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती म्हणुन फ्रामाहा बॅनजोंग आर्थिजवांग्सा थायलंड, डॉ. फ्रामाहा सुफारोक सुभट्टजरी थायलंड, प्रमूख उपस्थिती म्हणून द मोस्ट व्हेन. फ्रा देवपणाअभ्रोन, भिख्खू ज्ञानज्योती महास्थविर संघारामगिरी, भिख्खू सुगतानंद महाथेरो सचिव सुगतकुटी मालेवाडा, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भिख्खू धम्मचेती, कालिदास भोयर सरपंच मालेवाडा, जितेंद्र मोटघरे सामाजिक कार्यकर्ता, हेमंतकुमार गजभिये पोलीस पाटील मालेवाडा, जगदीश रामटेके अध्यक्ष बौध्द पंच कमिटी मालेवाडा, शंकर दडमल उपसरपंच, दिक्षाताई पाटील सरपंच लोहारा, मनोज मामीडवार माजी जिल्हा परिषद सदस्य, ईश्वर मेश्राम सामाजिक कार्यकर्ते कानपा, ओम खैरे सामाजिक कार्यकर्ते नेरी, काशिनाथ गजभिये, यशवंत सरदार, प्रविण जीवतोडे, पी. एस. खोब्रागडे उपाध्यक्ष गगन मलिक फाऊंडेशन, डॉ. मोहन वाकडे सदस्य गगन मलिक फाऊंडेशन, विकास तायडे, विनयबोधी डोंगरे, अनिरुद्ध दुपारे, अमित वाघमारे, विशाल कांबळे, वर्ष मेश्राम, गुणवंत सोनटक्के, आदी मान्यवर प्रमुख मंचावर उपस्थित होते. 

       कार्यक्रम दरम्यान अनिरुद्ध वनकर व कडुबाई खरात व चंद्रकांत शिंदे यांच्या भीम बुद्ध गीतांनी सूरु झाले.

          यावेळी कार्यक्रमाचे उद्धाघटक म्हणून आमदार बंटी भांगडिया म्हणाले की, डॉ. गगन मलिक यांनी चर्चे दरम्यान मला सांगितले की, सुगतकुटी मालेवाडा येथे थायलंड ला जसे सभागृह आहे तसे सभागृह येथे बनवून दया असे सांगितले मी गगन मलिक यांना शब्द देत थायलंडच्या धर्तीवर सुगतकुटी मालेवाडा येथे सामाजिक सभागृह आपण उभ करणार असुन, पूर्ण संरक्षण भिंत बनविण्याकरिता आपण प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून ते पण लवकरच पुर्ण करु विरोधकांनी अपप्रचार केला की संविधान बदलविनार म्हणुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलविण्याची कोणाचीही ताकत नाही. इतके मजबूत संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविले आहे.

          मागील ६५ वर्ष सत्ता असताना या संविधानात किती खोडतोड केले हे सांगत फिरत नाहीत अन् संविधान बदलविनार आहेत असा खोटा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. अश्या खोटारड्याना धडा शिकविण्याची आज गरज आहे असे त्यांनी सांगितले. 

       तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात धम्मदुत डॉ. गगन मलिक यांनी सांगितले की, आज शाळा ख्रिस्त बांधवांच्या आहेत त्यात ते प्रार्थना आपली सांगतात. ईतर शाळेत वेगवेगळ्या प्रार्थना घेतल्या जातात मी असे पाहिले आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत हा बौध्दमय करण्याचे स्वप्न साकारले होते ते स्वप्न तेव्हा पुर्ण होईल जेव्हा भारतातल्या प्रत्येक शाळेतून नमो तस भगवतो अरहतो सम्मा सम बुद्धस अशी प्रार्थना शिकविले जाईल तेव्हाच हा भारत बौध्दमय झाल्यासारखे वाटेल. तुम्ही सर्व बघा तेव्हाच या प्रत्येक शाळेतून विदयार्थी घडतील असे सांगितले.

          या चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया अनेकांना मद्दत करीत असतात. ते कोणत्या पक्षाचा आहे. कोणत्या समाजाचा आहे असे पहात नसून आमदार बंटी भांगडिया यांच्याकडे दुःखात आलेला प्रत्येक व्यक्ती हा सुखात हसत जात असतात असे मी जेव्हा आमदार बंटी भांगडिया यांचा अभ्यास केला तेव्हा मला कळले. म्हणुन आज मी या मंचावर सांगतोय की, चिमूर विधानसभा क्षेत्रात जर खरे मानवताची सेवा करणारे कोणी असेल तर ते आमदार बंटी भांगडिया हे आहेत.असे मत त्यांनी या कार्यक्रम व्यक्त केले आहे 

       सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत सरदार यांनी केले कार्यक्रमाचे संचालन खापरीचे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मेश्राम यांनी केले. तर आभार जयंता गौरकार यांनी केले. कार्यक्रमाला बौद्ध उपासक, उपसीका यांची मोठी उपस्थिती होती.

         कार्यक्रम यशस्वी करण्या करिता सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मोटघरे यांच्या नेतृत्वात बुद्ध पंच कमेटी मालेवाडा येथील बौद्ध उपासक, उपासिका यांनी प्रयत्न केले