मुनघाटे महाविद्यालयाची कु. लक्ष्मी कोवा सुवर्ण पदकाने सन्मानीत…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

धानोरा – येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा संचालित- श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे, कला – वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कु. लक्ष्मी जित्रु कोवा या विद्यार्थिनीने एम. ए. मराठी विषयात गोंडवाना विद्यापीठातून आदिवासी विद्यार्थ्यामधून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला.

           त्यामुळे नुकताच गोंडवाना विद्यापीठाच्या अकराव्या व बाराव्या दीक्षांत समारंंभात गोंडवाना गौरव- श्री. शांताराम पोटदुखे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठी विषयासाठी दिला जाणारा सुवर्ण पदक कु. लक्ष्मी कोवा या विद्यार्थिनी ने पटकावलेला आहे.

          याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सुवर्ण पदकांने सन्मानीत करण्यांत आले.

          धानोरा तालुक्यातील – नवरगांव या एका छोट्याश्या आदिवासी- बहूल खेड्यातील विद्यार्थिनींने गोंडी भाषा व छतीसगढी भाषेचे प्राबल्य असतांनाही मराठी सारख्या विषयांत अतुलनीय कामगिरी करत अनेक विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला.

        या प्रशंसनीय यशाबद्दल संस्थापक – अध्यक्ष , शालीनीताई रमेशचंद्र मुनघाटे, कार्याध्यक्ष – सौ. लिनाताई रोहनकर, सचिव – सौ. मिनलताई सहानी, सहसचिव – सौरभदादा रमेशचंद्र मुनघाटे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य- डॉ. पंकज चव्हाण, मराठी विभाग प्रमुख -डॉ. गणेश चुदरी यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी वृंद, विद्यार्थी आणि परिसरातील चाहत्यांनी अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या.