आमदार कृष्णाजी गजबे यांच्या माध्यमातून गोठणगाव येथिल पोलीस भरती करण्याऱ्या मुलांना पुस्तकांचं वाटप…

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

          कुरखेडा तालुक्याच्या गोठणगाव येथे आमदार कृष्णाजी गजबे यांचे माध्यमातून पोलिस भरती सहभाग करणाऱ्या मुलांकरिता लेखी परीक्षेच्या सरावासाठी वाचनालयात पुस्तकांचे वाटप करण्यात आले व फर्नीचर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले.

           यावेळी चांगदेवजी फाये तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कुरखेडा यांचे सह बंदी देवढगले,कमलाकर मांडवे,विवेक दुंगा,सियाराम नेवारे,हिराजी माकडे, केशव नैताम,जि.प.शाळेतील शिक्षक वृंद,विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

         वाचनालयासाठी उपलब्ध झालेल्या पुस्तकांची गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या सर्व विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आमदार कृष्णाजी गजबे व चांगदेवजी फाये यांचे मनपूर्वक आभार मानले.