भावीकदास करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा..
धानोरा तालुक्यातील निमानवाडा गट ग्रामपंचायतला,”टिबी मुक्त, ग्रामपंचायत अभियान पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
गडचिरोली जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात टि.बी.मुक्त गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून,”टिबी मुक्त, अभियान राबविण्यात आले होते.
त्यात धानोरा तालुक्यातील अनेक गावे,ग्रामपंचायत गावे,शहर,टिबी मुक्त झाले आहेत.
या गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.माधुरी किलनाके जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पंकज हेमके,जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.डोलारे,गडचिरोली वैद्यकीय अधिकारी डॉ. उपलेंचेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या सर्वे मध्ये,”निमानवाडा गट ग्रामपंचायत मध्ये,टी.बी.चा एकही रुग्ण मिळालेला नाही.गडचिरोली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा सन्मान निमनवाडा येथील उपसरपंच चेतन सुरपाम यांनी स्वीकारला.
यावेळी निमगाव येथील परिचारिका निकुरे शिस्टर,आशा वर्कर गयाबाई खोब्रागडे आणि प्रतिष्ठित नागरिक राजू वरखडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन हेमके तर संचालन राजेश खडसे समन्वय यांनी केले.