नंदलाल पाटील कापगते विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली :- नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे 2 ऑक्टोंबर रोजी सत्य व अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व ‘जय जवान जय किसान’ चा नारा देणारे लालबहादूर शास्त्री या दोन थोर पुरुषांच्या जयंतीचा कार्यक्रम विद्यालयात साजरा करण्यात आले.

           कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती आर.बी.कापगते यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.के.जी.लोथे, प्रा. स्वाती गहाणे, डी.एस. बोरकर, राजेश कापगते, एम.एम.कापगते व इतर मान्यवर उपस्थित होते. 

           गांधीजींच्या विचारात एकमेकांचे शब्द पाडणे, अहिंसात्मक लढा देणे यांना फार महत्त्व होते. गांधीजींनी आपल्या आयुष्य सत्येच्या शोधासाठी अर्पण केले असून सत्य व अहिंसेचे तत्वे जीवनात प्रत्येकाने आचरणात आणून आपल्या समाजाची, राष्ट्राची व देशाची सेवा घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे, असे मौलिक विचार मुख्याध्यापिका श्रीमती आर.बी.कापगते यांनी व्यक्त केले.

        तसेच प्रमुख अतिथी प्रा. के.जी.लोथे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, शालेय जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी थोर मोठ्यांची चरित्रे वाचून त्यांचे आदर्श आपल्या अंगी बाणवला पाहिजे, तसेच स्वच्छते विषयी महत्व, व्यसनमुक्ती, तंबाखूमुक्ती विविध उपक्रमाद्वारे जनजागृती कशी करता येईल व आपली शाळा सुंदर शाळा कशी होईल याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.

      संचालक आर.व्ही.दिघोरे तसेच आभार प्रदर्शन एस.व्ही. कामथे यांनी केले. 

        कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.