लेखापाल गणेश वडीचारे यांना साकोलीत सेवानिवृत्ती निरोप… — विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेत दिली तब्बल ३७ वर्ष सेवा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

 साकोली :- जिल्ह्यातील ग्रामीण शेतकऱ्यांची असरेली सहकारीता बॅंक भंडारा ग्रामीण व आताची विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेतील ३७ वर्ष सेवा करणारे लेखापाल गणेश शंकरराव वडीचारे यांना ( सोम. ३० सप्टें. ला ) बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती निरोप समारंभ आयोजित करून त्यांना निवृत्ती निरोप दिला. याप्रसंगी सर्व कर्मचारी हे भावूक झाले होते हे विशेष. 

         गणेश शंकरराव वडीचारे यांचा जन्म १६ सप्टेंबर १९६४ ला भंडारा येथील एका सामान्य कुटुंबात झाला. गरीबीतून शिक्षण पूर्ण झाल्यावर ते १९८७ ला भंडारा ग्रामीण बॅंक येथे प्रथम शिपाई पदावर लागले. त्यानंतर हीच बैंक विदर्भ कोकण ग्रामीण बैंकेत १९९३ ला अर्जूनी मोरगाव इटखेडा येथे ३ वर्ष, अर्जूनी/मो. १० वर्ष, २००७ ला पेट्रोलपंप ठाणा, भंडारा येथे १ वर्ष, २०१२ ला गणेश वडीचारे यांची पदोन्नती होत पवनी येथे लेखापाल म्हणून व ०१/०१/२०१७ ला साकोली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बैंकेत लेखापाल अशी तब्बल ३७ वर्षांची सेवा दिली. 

         सोमवारी साकोली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बैंकेत आयोजित सेवानिवृत्त सत्कार कार्यक्रमात गणेश शंकरराव वडीचारे यांना निरोप देतांना बॅंकेचे व्यवस्थापक पवन सदावर्ती, प्राची वानखेडे, रूपल खोटेले, कर्मचारी खुमेंद्र रहांगडाले, शिवशंकर शेंदरे, अरविंद कटनकर हे उपस्थित होते.

         निरोप देतांना मात्र सर्व कर्मचारी हे गहिवरून आले होते. सेवानिवृत्त समारोप घेतांना गणेश वडीचारे यांनी सांगितले की, आजच्या युवा विद्यार्थ्यांना बॅंकीग क्षेत्रातील अभ्यासक्रम करीत उच्च शिखर गाठले पाहिजे. त्यातच एकनिष्ठ, कर्तव्यदक्ष, प्रत्येक ग्राहकांनी आपुलकीचा व्यवहार ठेवून आपला भविष्यातील सिद्धांत पूर्ण करावा असे आवाहन केले.