जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा येथे “म.गांधी व लाल बहादूर शास्त्री” जयंती साजरी…

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

               जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा येथे “म.गांधी व लाल बहादूर शास्त्री “यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे सुरुवात”राज्य गीताने करण्यात आली”कार्यक्रमाचे अध्यक्ष ए.एन.बढई (मुख्यध्यापक)यांनी भुषविले.अध्यक्ष महोदयांनी म.गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पन करून व्दिप प्रज्वलित केले.सर्व विद्यार्थ्यांना म.गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती दिनानिमित्त मार्गदर्शन केले.

          यावेळी प्रास्ताविक कु.दिक्षा उसेंडी वर्ग 9 वी तर संचालन सागर हलामी वर्ग 9 वी यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांनी म.गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जिवन चरित्रावर भाषन सादर केले.

          कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कु.ए.बी.शेख , एल. धुडसे सी.डी.गदेवार.(शिक्षक) एस.पी.मारकवार , ए.एस.संतोषवार.(शिक्षकेत्तर)यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आदीत्य हलामी वर्ग 9 वी यांनी केले. तसेच कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.