बाईक चोरी करणारे चार आरोपी गजाआड…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- ग्रामीण रुग्णालय परिसरातून मोटार सायकल चोरी करणारे व अॅक्टिव्हा चोरी करणाऱ्या आरोपींना पारशिवनी पोलिसांनी गजाआड केले आहे.

        पारशिवनी पो.स्टे. हद्दीतील येथे आठवडी बाजार असल्याने फिर्यादी नामे संजय परसराम दुनेदार वय 36 वर्ष रा. बाबुळवाडा,ता.पारशिवनी यांनी त्यांची Discover-150 मोटर सायकल क्र.MH-40-AL-5326 किं. अंदाजे ३५,०००/- रु ही ग्रामीण रुग्णालय पारशिवनी जवळ ठेवून बाजार करायला गेले व बाजार करून परत आले असता त्यांनी ठेवलेल्या ठिकाणी त्यांची Discover-150 मोटर सायकल दिसून आली नाही.

       परिसरातील लोकांकडून माहिती घेतल्यावर दोन अनोळखी इसमांनी सदर मोटर सायकल ढकलत चोरून नेली आहे,अशी माहिती मिळाली.यावरून फिर्यादी यांनी पो.स्टे.ला दिलेल्या रिपोर्ट वरून अप.क्र. ३५८/२४ कलम ३०३ (२) BNS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

      सदर गुन्ह्याचे तपासात पो.स्टे. पारशिवनी येथील डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर आरोपींचा शोध घेतला असता फिर्यादीने रिपोर्ट मध्ये नमूद केले प्रमाणे दोन इसम नामे १) अमोल शुद्धोधन भिवगडे वय ३३ वर्ष रा. कांजी हाऊस जवळ पारशिवनी व २) निखील मधुकर रायपुरकर वय ३१ वर्ष रा.बारई मोहल्ला पारशिवनी यांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर त्यांनी सदर मोटर सायकल चोरी केल्याचे कबूल केले.

       सदर दोन्ही आरोपितांकडुन चोरी गेलेली Discover-150 मोटर सायकल क्र.MH-40-AL-5326 किं. अंदाजे ३५,०००/-रु. ही हस्तगत करण्यात आली.

        तसेच त्याच प्रमाणे पो.स्टे. पारशिवनी येथील डी.बी.पथकातील अधिकारी व कर्मचारी हे आज दिनांक. ०१/१०/२४ चे रात्री दरम्यान गस्त करीत असता दोन इसम नामे १) अंचल संतकुमार सराठे वय २० वर्ष रा. सटवा मत मंदिर जवळ सावनेर व २) गौरव दिपक रुशिया वय २० वर्ष रा. वार्ड नं. १७, पहलेपार सावनेर हे अक्टीव्हा मोपेड क्र. MH-40-AG-3803 किं. अंदाजे ३०,०००/- रु ही संशयित रीत्या चालवितांना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर त्यांनी सदरची अक्टोव्हा मोपेड क्र. MH-40-AG-3803 ही आज रात्रीचे ०१:०० वा. चे सुमारास कळमेश्वर येथून चोरी केल्याचे कबूल केले. 

         या वरून दोन्ही इसम व अक्टीव्हा मोपेड क्र. MH-40-AG-3803 ही ताब्यात घेण्यात आली. सदर दोन्ही इसम व अक्टीव्हा मोपेड क्र. MH-40-AG-3803 ही पुढील कार्यवाहीस पो.स्टे. कळमेश्वर चे ताब्यात देण्यात आली.

       सदर कार्यवाही ही पोलीस अधिश्वक नागपुर ग्रामीण श्री.हर्ष ए.पोद्दार,अपर पोलीस अधिक्षक श्री.रमेश धुमाळ,उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग श्री.रमेश बरकते,यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. पारशिवनीचे ठाणेदार राजेशकुमार थोरात,पोउपनि/शिवाजी भताने,पोउपनि/संघमित्रा बांबोडे,स.फौ.देवानंद उकेबोंद्रे,स.फौ./रामराव पवार, पोहवा/मुदस्सर जमाल,पोअं/विरेंद्रसिंग चौधरी,राकेश बंधाटे,पृथ्वीराज चौव्हान,भुषण भोंडे व चालक संदीप बळेकर यांचे पथकाने केली.