अनिल किरणापूरे राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते सन्मानित…

संजय टेंभुर्णे

कार्यकारी संपादक

दखल न्यूज भारत

 मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते स्विकारला पुरस्कार

        कृषी विभागातर्फे देण्यात येणारे मागील तीन वर्षापासूनचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे राज्य सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.   

          परसोडी क्षेत्राचे पं.स.सदस्य व लवारी येथील युवा व नवोपक्रमशील शेतकरी अनिल शिवलाल किरणापूरे यांना देखील या सोहळ्यात २०२१ च्या राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

         मुंबईच्या वरळी भागात कृषी विभागातर्फे आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषि मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते अनिल किरणापूरे यांना महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

        राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण गट), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (आदिवासी), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न आणि उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार असे  पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतात. गेल्या दोन वर्षांचे पुरस्कार जाहीर झाले होते. मात्र आतापर्यंत त्यांचे वाटप करण्यात आलेले नव्हते. 

        विदर्भातील फार मोजक्या शेतकर्‍यांमध्ये लवारी येथील अनिल किरणापूरे या युवा शेतकर्‍याची पुरस्कारासाठी निवड झाली. या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.