वरुड येथे हसत खेळत विज्ञान कार्यक्रम..  — कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धाचा स्तुत्य उपक्रम..

     रोहन आदेवार 

जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ 

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी वर्धा..

वर्धा: कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा यांच्या समन्वयातून क्षेत्रकार्य संस्था ग्रामपंचायत वरुड अंतर्गत जिल्हा परिषद शाळा वरुड येथे ‘हसत खेळत विज्ञान’ या अंतर्गत व्याख्यानासह प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

     ज्ञवैज्ञानिक प्रयोगासह व्याख्यान सारीकाताई देहनकर यांनी केले.मार्गदर्शन करताना देहनकर म्हणाले की, “हल्लीच्या काळात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने हसत खेळत विज्ञान समजूया या संकल्पनेतून अनेक प्रयोग विद्यार्थ्यांना सांगितले.प्रयोगांच्या अंतिम टप्प्यात देहनकर यांनी चमत्कार वाटणाऱ्या प्रात्यक्षिकांमागील कार्यकारण भाव तथा वैज्ञानिक सत्य स्पष्ट केले.

   ज्ञप्रयोगात देहनकर यांनी विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतल्याने विद्यार्थ्यांचे कुतूहल वाढून त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वर्धिष्णू झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता ढवळे होत्या.

       कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंदू पोपटकर सर हे कार्यक्रमाचे संयोजक होते.

         कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता गेडाम मॅडम,अंगणवाडी सेविका मुन मॅडम उपस्थित होत्या.

      कार्यक्रमाच्या यशस्वी कार्यवाहीसाठी प्रा.डॉ.कमल पोटदुखे प्रा.नरेश पाटील,प्रा. नलिनी भगत,प्रा.विशाखा मानकर व रुपाली फाले,शंकर मंदे,अंकित तेलंग,सारा लोंढे,कोमल छापेकर,समीक्षा पाटील,अस्मिता पाटील,दिव्यांशू गेडाम,साक्षी डूडूरे,आशिष सिराम,आदित्य गायकवाड,निखिल खेडकर,काजल खोंड,मोनिका वर्भे यांनी सहकार्य केले.

      कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी व समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलराम जाधव यांनी केले व प्रास्ताविकेतून प्रा.मंजुषा देशमुख व्यक्त झाल्यात तर आभार प्रदर्शन,पत्रकार रोहन आदेवार यांनी केले.