उमेश कांबळे ता प्र भद्रावती
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाची जिल्ह्यातील एकमेव भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन झाली. आज (दि.१३) ला पार पडलेल्या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत सर्वानुमते शेतकरी सहकार शिवसेना पैनलचे भास्कर लटारी ताजने यांची सभापतीपदी तर आश्लेषा शरद जीवतोडे यांची उपसभापतीपदी निवड झाली.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दि. ३० एप्रिल रोजी पार पडली होती. रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वातील शेतकरी सहकार शिवसेना पैनलने या निवडणुकीत १२ जागांवर विजय मिळवून बहुमत प्राप्त केले होते. तर काँग्रेस पक्षाचे खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पैनलला एकूण ६ पदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे बहुमतात असलेल्या रविंद्र शिंदे यांच्या गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता.
भास्कर लटारी ताजने, (सभापती) तर आश्लेषा शरद जीवतोडे, (उपसभापती) इतर संचालक ज्ञानेश्वर राजाराम डुकरे, मनोहर शत्रुघ्न आगलावे, विनोद बापुराव घुगल, शरद महादेव जांभुळकर, कान्होबा लटारी तिखट, गजानन दीनाजी उताने, मोहन व्यंकटी भुक्या, शांताबाई लटारी रासेकर, परमेश्वर सदाशिव ताजने, शामदेव गणबाजी कापटे असे नविन संचालक मंडळातील संचालकांची नावे आहेत.
काल (दि.१२) ला वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे व मित्र गटाने सत्ता स्थापन केली व आता भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता स्थापन झाल्याने वरोरा विधानसभा क्षेत्रातील राजकारणात रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व सिध्द झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील एकमात्र बाजार समितीवर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा) झेंडा फडकला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे तथा संजय राऊत यांनी या निकालाची दखल घेत नविन संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.
यावेळी बोलताना रविंद्र शिंदे म्हणाले की हा लोकशाहीचा विजय आहे. आम्हाला मिळालेली सत्ता हे जनसेवेचे फळ आहे. या क्षेत्रात शांतता, सुव्यवस्था, जनसेवा, विकास व लोकशाही नांदावी यासाठी आमचे अविरत प्रयत्न सुरू आहे. कोणताही अनुचित मार्ग आम्ही स्वीकारला नाही की पुढे स्वीकारणार नाही. जनता आमच्या पाठीशी आहे. जनतेला या क्षेत्रात बदल हवा आहे आणि जनताच हा बदल घडवून आणत आहे, आता यापुढेही या बदलांची पुनरावृत्ती होत राहणार आहे. आम्ही सतत जनसेवा करत राहू, अशी ग्वाही देतो. सदर नवनियुक्त संचालक मंडळ हे शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, वंचित यांच्या हक्कासाठी अहोरात्र कार्यरत राहील. सर्वांचे मत जाणुन व विशेष करुन ज्या कार्यकर्त्याने तथा शिवसैनिकाने परिश्रम घेतले त्यांचे सुध्दा मते जाणुन घेवुन पदाधिकारीची निवड करण्यात आली. या क्षेत्रात विकासाच्या झंझावात आम्ही करू व सर्वांना घेवून चालू, असे प्रतिपादन केले.
शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, तालुका प्रमुख तथा नगरसेवक नरेंद्र पढाल, भद्रावती नागरी सहकारी पत संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक व माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डूकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे, माजी नगरसेवक तथा गुरुजी फाऊन्डेशचे अध्यक्ष प्रशांत कारेकर, ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी खेमराज कुरेकर, दत्ता बोरेकर, अखील भारतीय सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा पानवडाळा ग्रा.पं. सरपंच प्रदिप महाकुलकर, मुधोली ग्रा.पं. सरपंच बंडू पा. नन्नावरे, नंदोरी ग्रा.पं. उपसरपंच मंगेश भोयर, मुरसा ग्रा.पं. उपसरंपच सुनिल मोरे, भद्रावती कृ. उ. बा.स. च्या माजी उपसभापती अश्लेषा जीवतोडे-भोयर, शांता रासेकर, डॉ. नब्बू दाते, संजय तोगट्टीवार, युवराज इंगळे, यांच्यासह तालुक्यातील ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासह असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते या सर्वांचा या यशात सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पी. व्ही. संधू यांनी काम बघितले.