क्रांतीभूमी चिमूर शहरामध्ये चिमूरचा राजा गणेश मंडळातर्फे सतत १० दिवस नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आले चर्चेला उधाण…  — मनोरुग्णाच्या हस्ते गणेशाची आरती… — रक्त दान हेच सर्व श्रेष्ठ दान… — सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे हस्ते मनोरुग्णाचे सत्कार…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात दिनांक. २१/०९/२०२४ ला चिमूर चा राजा गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली.

        दिनांक२२/०९/२०२४ ला आरोग्य व रक्तदान शिबीर घेण्यात आले. डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय विशेष वैधकीय मदत आरोग्य तपासणी केली. बीपी, शुगर, इसीजी तपासणी करण्यात आली.

          या शिबिरात ४५ पुरुष व ५ महिला यांनी रक्तदान केले तर १०० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शस्त्रक्रिया किंवा मोठ उपचार आढळल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातुन मोफत उपचार करणार असल्याची माहिती उत्सव समिती चे शुभम भोपे यांनी दिली.

          या रक्तदान व आरोग्य तपासणीला शिबीर यशस्वी करण्यासाठी जय श्रीराम बाल गणेश उत्सव समितीच्या समस्त मंडळानी अथक परिश्रम घेतले.चिमूर चा राजा जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती चिमुर मध्ये चिमुर नगरपरिषदचे साफसफाई कर्मचारी आणि मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली तसेच साफसफाई कर्मचारी यांचे समितीच्या सदस्यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आले.

          तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांंना भेट वस्तू सुद्धा देण्यात आली. साफसफाई कर्मचारी आणी मूकबधिर विद्यार्थ्यांचे भोजन दान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. चिमूरचा राजा जय श्रीराम बाल गणेश उत्सव समीती चिमूर मध्ये आज चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक फुलेकर तसेच दिव्यवंदना आधार फाउंडेशन चे सर्वेसर्वा शुभम पसारकर यांचे हस्ते चिमूर चा राजा श्री ची आरती करण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.

          या कार्यक्रमामध्ये चिमूर शहरातील गेली कित्येक वर्ष अनाथ बेघर बेवारस फिरत असलेले राजु नावाचे इसम त्यांना आधार देणारे शुभम पसारकर यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. 

            सुत्रसंचालन सौ. नितुताई पोहनकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच आभार प्रदर्शन राजुभाऊ दांडेकर यांनी केले. या कार्यक्रमा करीता समस्त उत्सव समीतीच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेत श्री गणेशाच्या नामस्मरनाने सुरवात आणि सांगता करण्यात आली विशेष सहकार्य सी.सी.कंपनी चिमुर यांनी केले.

            अशाप्रकारे दिनांक३० सप्टेंबर २०२४ पर्यंत भक्तीभावाने नावीन्यपूर्ण दहा हि दिवस भरगच्च कार्यक्रमाणे चिमूर वासीय जनतेचे लक्ष वेधून सर्वत्र चर्चा रंगू लागली.