शासकीय निवासी शाळा चिमूरच्या चिमुकल्यांनी जिल्ह्यात प्रथम येऊन गाठला विभागस्तर…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :- क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अनुसुचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा, चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथील 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींनी दि. 28/09/2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे घेतल्या गेलेल्या U 14 खो खो स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाला जेरीस आणून त्यांचा दणदणीत पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला. 

            या गटामध्ये कु. विकृत्वा मानवटकर,गायत्री कोसे, श्रुंखल भरडे, अंजुम दहीवले, आकांक्षा वावरे, स्नेहल मेश्राम, श्रेया हनवते, एंजल गेडाम, रुतिका राणे, आरुषी देठे, त्रिशा पाटील, गायत्री सावसाकडे आणि श्वेता रामटेके यांनी विभागस्तर गाठून शाळेला मानाचा तुरा रोवला.

            चिमुकल्यांच्या या यशाबद्दल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीमती प्रतिभा भागवतकर यांनी कौतुक केले.

           दरम्यान गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती चिमूर श्री रुपेशजी कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी टि. आर. महल्ले, स्वप्नील खांडेकर, विशाल बोधाने, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता खोब्रागडे, शाळेचे शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी सतीश कुकडे, विनय खापर्डे, अनुराधा महाजन, हेमुताई मगरे, बॉबी धात्रक, तासिका तत्त्वावरील शिक्षक आणि सर्व बाह्यस्त्रोत कर्मचारी यांनी विजेत्या संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.