साकोलीत तब्बल १०५ रक्तदात्यांचे स्वेच्छा रक्तदान… — स्व.गिताताई कापगते स्मृती प्रित्यर्थ रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबीर…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली : महिला शक्ति व सशक्तीकरण लढ्याच्या रणरागिणी आणि नाट्य अभिनय क्षेत्रातील झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळख असलेल्या स्व. गिताताई कापगते यांच्या स्मरणार्थ शनिवार २८ ला श्रीराम भक्त हनुमान मंदिर तलाव वार्डात भव्य रक्तदान शिबिरात तब्बल १०५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यात ८७ जणांनी डोळ्यांची तपासणी या शिबिराचाही लाभ घेतला.

         सदर आयोजन सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संस्था व इंजि. सपन शरद कापगते मित्र परिवार यांनी केले होते. 

      स्व. गिताताई कापगते यांच्या चौथ्या पुण्यस्मरण निमित्ताने आयोजित भव्य रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यात नेत्र रूग्णांनी नेत्र चिकित्सा शिबीराचा लाभ घेतला.

         शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी आ. राजेश ( बाळा ) काशिवार, माजी आ. डॉ. हेमकृष्ण कापगते, स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसा. अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, माजी नगर उपाध्यक्ष जगन उईके, डॉ. दूर्वास कापगते, जिपस वनिता डोये, रमेश खेडीकर, डॉ. आनंद कापगते, डॉ. कार्तिक लंजे, सरपंचा पूजा देशमुख, उपसरपंचा भूमिता धकाते, ॲड. दिलीप कातोरे, माजी नगरसेवक मिना लांजेवार, रवि परशुरामकर, ॲड मनिष कापगते, लखन बर्वे, दिपक हिवरे, शरद कापगते, प्रशांत डोमळे, डॉ. अतुल दोनोडे, प्रभाकर सपाटे, डॉ. नरेश कापगते, कुंदन वल्के, भिमराव गहाणे, रमेश मुंगूलमारे, गिता बोरकर, कुंदा मुंगूलमारे, डॉ. मोहिनी हांडेकर, सपन कापगते, संजय कापगते, गुलाब कापगते, प्रा. प्रदीप गोमासे, प्रविण हांडेकर, मनिषा काशिवार, राहूल देशमुख, अनिल मुरकुटे, जयराम गोबाडे, नरेंद्र वाडीभस्मे, गोलू धुर्वे आदी उपस्थित होते. येथे तब्बल १०५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले तर ८७ जणांनी नेत्र तपासणी करीत नेत्र चिकित्सा शिबीराचाही लाभ घेतला. शिबिरात रक्तसंकलन समर्पन रक्तपेढी भंडारा येथील डॉ. रजा शेख, डॉ. नखाते, परीचारीका पोर्णिमा मेश्राम, प्राजक्ता त-हेकार, पुनम गायकवाड, आचल लांजेवार, वाल्मिकी बोंद्रे नेत्र चिकित्सा चमुतील डॉ. वीर भांदककर, विकास बडोले, दिक्षा जनबंधू, राणी खुळसिंगे यांनी येथे आरोग्य सेवा प्रदान केली. 

       सदर रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबीर यशस्वी करण्यासाठी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, श्री बाल गणेश उत्सव मंडळ, इंजि. सपन कापगते मित्र परिवार साकोली आणि मित्र परिवाराचे सागर पुस्तोडे, प्रितम कापगते, चंदू कापगते, कुणाल देशमुख, शैलेश गोबाडे, रोहित गुप्ता, प्रज्वल रोकडे, विलास लांजेवार, पुष्कर करंजेकर, सोनू तांडेकर, भाविक लांजेवार, वैयजंता कापगते, शकुंतला कापगते, अंशिका कापगते, अनिता कापगते, देवश्री कापगते, कल्पना कापगते, प्रिया कापगते, वेणू कापगते व सर्व इंजि. सपन शरद कापगते मित्र परिवार सदस्यगणांनी अथक परिश्रम घेतले.

            येथे साकोली मिडीयाचे आशिष चेडगे यांनी प्रथमच रक्तदान शिबीरात त्यांचे दुर्मिळ रक्तगट असणारे बी निगेटिव्ह गटाचे रक्तदान केले की जे रक्तगट अतिशय कमी प्रमाणात आढळत असते व हे साकोलीत केवळ पाच सहा जणांमध्ये आहे. याबद्दल सर्व आयोजकांनी आशिष चेडगे यांचे कौतुक केले आहे.