पलसगड येथे गोठ्यात असलेल्या शेळी व बोकडाचा फाडसा पाडत बिबट्यांनी केले फस्त…

     राकेश चव्हाण 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

           पलसगड येथे संजय मडावी या शेतकरऱ्यांच्या गोठ्यात असलेल्या शेळी व बोकडाला काल मध्यरात्री बिबट्यांनी ठार करीत फस्त केले असल्याची घटना घडली.

       आज दि .२८ सप्टेबंर शनिवार रोजी सकाळी ८ वाजता वनविभागाचा चमूने घटणास्थळ गाठत घटनेचा व नूकसानीचा पंचनामा केला. 

        तालूक्यातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पलसगड येथे काल रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सूमारास गावकऱ्यांना एक वयस्कर बिबट गावात फिरत असल्याचे दृष्टीपथास आले.त्यामुळे गावकऱ्यात घबराहट निर्माण झाली होती.

        यावेळी गावकऱ्यांनी फटाके फोडल्याने बिबट जगंल असलेल्या डोगंराचा दिशेने पळून गेला असा गावकऱ्यांचा समज झाला.

        मात्र बिबटने मध्यरात्री पून्हा गावात येत संजय मडावी यांचा गोठ्यात प्रवेश केला.येथे पाच ते सहा शेळ्या,बोकड होते.यापैकी एक शेळी व एका बोकडावर हल्ला करीत ठार केले.

         यावेळी शेळ्यांचा किंचाळण्याच्या आवाजाने शेतकरी जागा झाला.मात्र त्याची तिथे जाण्याची हिम्मत न झाल्याने त्याने ही सूचना गावकऱ्यांना दिली.गावकरी एकत्र गोळा होत हल्ला केल्याने बिबटने तिथून जगंलाकडे धूम ठोकली.

        घटनेची माहिती मिळताच आज सकाळी पलसगडचे वनक्षेत्र साहायक एस.एस.शेंडे,वनरक्षक के.के.काशीवार यांनी घटनास्थळ गाठत नूकसानीचा पंचनामा केला.

       वनविभागाने नूकसान ग्रस्त पशूपालकाला तातडीने नूकसान भरपाई अदा करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.