शालेय विद्यार्थांचा सती नदीच्या रपट्यावरून दोरखंडाच्या सहाय्याने जिवघेणा प्रवास…

     राकेश चव्हाण 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

           कुरखेडा शहराचा सती नदीच्या घाटावरील वाहून गेलेल्या रपट्यावर दोन्ही बाजूला मोठ्या दगडावर दोरखंड बांधत त्या आधारे शालेय विद्यार्थी तसेच नागरीकांना नाईलाजाने हा धोकादायक प्रवास करीत तालुका मूख्यालय गाठावे लागत असल्याची वेदणादायी परिस्थीती निर्माण झाली आहे.

              सतीनदीचा रपटा दोन वेळा पाण्याचा प्रवाहात वाहून गेला त्यामूळे येथील वाहतूक बंद झाली आहे. त्यामूळे तालूका मूख्यालयात असलेल्या शाळा महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थाना येण्यास मोठी अडचण झाली आहे.पर्यायी मार्ग १४ कीलोमीटर फेऱ्यांचा तसेच खड्डेमय असल्याने व विद्यार्थाकरीता राबविण्यात येणारी बसेस शाळेचा वेळेवर पोहचत नसल्याने शैक्षणिक नूकसान होऊ नये म्हणून गोठणगांव,येरंडी,जांभूळखेडा,मालदूगी,चांदागड,शिवणी,सोनसरी तसेच अन्य ग्रामीण भागातील विद्यार्थी या फूटलेल्या रपट्यावर दोन्ही बाजूला मोठ्या दगडावर दोरखंड बांधत त्याचा आधाराने हा अवघड व धोकादायक प्रवास पायपीट करीत पूर्ण करत आहेत. 

        विद्यार्थी व नागरीकांची होणारी ही व्यथेची दखल घेत तातडीने वाहून गेलेल्या या रपट्याची दूरूस्ती राष्ट्रीय महामार्ग विभागाने व संबधित कंत्राटदार कंपनीने करावी अशी मागणी नागरीकाकडून करण्यात येत आहे.