तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत थोरवी महाविद्यालयाची बाजी…

     राकेश चव्हाण

 कुरखेडा तालुका प्रतिनिधी

 श्रीराम महाविद्यालय कुरखेडा येथे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये थोरवी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा यांनी श्रीराम महाविद्यालय कुरखेडा यांचा पराभव करत मुले सतरा वर्ष वयोगट व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावलेला आहे.

          जिल्हास्तरीय होणाऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदविणार आहेत व कबड्डी क्रीडा स्पर्धेत मुले 17 वर्षे वयोगट दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

           याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिकेत आकरे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले, तसेच शारीरिक शिक्षण विभाग प्राध्यापक डी डी सहारे, प्राध्यापक पंकज बनसोड, प्राध्यापक अनिल गजभिये, गोपाल वैरागडे यांनी अभिनंदन केले व सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात आहे.