श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे कार्य शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायी :- आ.भरत गोगावले…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : देशाचे व्यापक सामाजिक, राष्ट्रहित साध्य करण्यासाठी देशातील शैक्षणिक संस्थांचे मोठे योगदान राहिले आहे. हेच उदिष्ट ठेवून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था वाटचाल करत आहे. संस्थेमुळे परिसरातील गरीब व शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षणाची सोय झाली आहे.

             संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. संस्थेचे विद्यार्थी शिक्षणाबरोबरच कला क्रीडा व सामाजिक क्षेत्रातही दैदीप्यमान कामगिरी करत आहेत. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे कार्य शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायी आहे असे मनोगत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आ.भरत गोगावले यांनी व्यक्त केल.

            श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, प्राचार्य दिपक मुंगसे, अनिल वडगांवकर आकाश भोंडवे, प्रकाश पवार, श्रीरंग पवार, राजश्री भुजबळ, वाय.एस.कांबळे, गणेश लिखे आदी उपस्थित होते.

           राज्यात अनेक अंशतः विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न व शिक्षण संबंधीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्वांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार असेल्याचे आ.भरत गोगावले यांनी सांगितले.