कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातंर्गत बाबुलवाडा येथील लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि सामाजिक वनिकरण कार्यालय पारशिवनीच्या वतीने संयुक्त रित्या,” शाळेच्या आवारात एकूण ५० वृक्ष रोपण रोपे लावण्यात आले.
वृक्षारोपण प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका सौ.राजश्री उखरे मॅडम व शाळेतील इतर शिक्षक वृंद,शिक्षिका,विद्यार्थी व पारशिवती वनिकरण विभागचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. किशोर कैलूके,सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी मोरगांव-अर्जुनीचे श्री.खोब्रागडे सर,वनपाल श्री.अनिल राठोड,वनरक्षक श्री.सुरज चोपडा,वनसेवक श्री.मनोहर शेंडे,श्री.ढोके व इतर वन कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर विद्यालयाच्या व कनिष्क महाविद्यालयाच्या प्रांगणात विभिन्न प्रजातीचे ५० वृक्षरोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन शाळेतील प्रयवेक्षक शिक्षक बावनकुळे सर यांनी केले तर आभार सामाजिक वानिकरण विभागाचे वनपाल अनिल राठौड यांनी मानले.