भाविकदास करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा
काकडयेली येथून ट्रॅक्स मध्ये बसून घरून निघून गेलेल्या दोन बेपत्ता बहिणीचा शोध धानोरा पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत 25 सप्टेंबरला दुपारी बारा वाजता लावून दोन्ही बहिणींना कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
काकडयेली येथील रहिवासी नामे सिताराम कारू बोगा वय 62 वर्षे यांनी पोलीस स्टेशन धानोरा येथे येऊन रिपोर्ट दिली होती.त्यांची मोठी मुलगी छाया हलामी वय 33 वर्षे राहणार वानरचुवा,तालुका आरमोरी ही वानर चुवा येथून माहेरी त्यांना भेटण्यासाठी सात सप्टेंबर रोजी काकडयेली येथे आली होती व ती तेव्हापासून त्यांच्याकडे राहत होती.
परंतु 20 सप्टेंबर रोजी अंदाजे तीन ते साडेतीन वाजता त्यांची लहान मुलगी शीला सिताराम बोगा वय २० वर्षे राहणार काकडयेली हिचे सोबत कोणालाही न सांगता काळी पिवळी ट्रॅक्स मध्ये बसून धानोरा कडे जाताना दिसल्यात.
परंतु रात्री उशिरापर्यंत त्या परत आल्या नाही.याबाबत नातेवाईक व मैत्रिणीकडे विचारपूस केली असता शोध लागला नाही.
24 सप्टेंबर रोजी फिर्यादी सिताराम बोगा यांनी तोंडी रिपोर्ट धानोरा पोलीस स्टेशन येथे दिली. त्यानंतर छाया हलामी व शीला बोगा या दोन्ही बहिणीचा शोध घेताना धानोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी स्वप्निल धुळे यांना त्यांच्या गोपनीय सूत्राकडून दोन्ही मुली औंधी छत्तीसगड येथे गेल्या असून छाया हलामी ही रागाच्या भरात निघून जाऊन जीवाचे बरे वाईट करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ येथील पोलिसांसी संपर्क साधून ताबडतोब औंधी येथे जाऊन सतर्कतेने 24 तासाच्या आत दोन्ही बेपत्ता मुलीचा शोध लावला.
सदर दोन्ही बहिणींना पोलीस स्टेशनला आणून सुखरूप वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.सदर कारवाई धानोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स्वप्निल धुळे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चैत्राली भिसे,पोलीस हवालदार भजनराव गावडे,पोलीस अंमलदार प्रियंका कावडे,वैष्णवी पालरतिवार यांनी शोध लावला.